लोकसभेसाठी आठवडाभरात कॉंग्रेसची उमेदवारी यादी जाहीर होणार, बाळासाहेब थोरात यांचे विधान

By मनोज शेलार | Published: March 4, 2024 05:31 PM2024-03-04T17:31:53+5:302024-03-04T17:33:27+5:30

कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आठवडाभरात जाहीर होतील.

congress candidate list for lok sabha will be announced within a week says minister balasaheb thorat | लोकसभेसाठी आठवडाभरात कॉंग्रेसची उमेदवारी यादी जाहीर होणार, बाळासाहेब थोरात यांचे विधान

लोकसभेसाठी आठवडाभरात कॉंग्रेसची उमेदवारी यादी जाहीर होणार, बाळासाहेब थोरात यांचे विधान

मनोज शेलार, नंदुरबार : कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आठवडाभरात जाहीर होतील. आघाडीत केवळ तीन ते चार जागांचा प्रश्न आहे, तो चर्चेने सुटेल असा विश्वास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. 

ते म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदुरबारात येणार आहे. त्याची तयारी पुर्ण झाली आहे. नंदुरबारात या अंतर्गत जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत बोलतांना ते म्हणाले, लोकसभेच्या कोणत्या जागा लढवाव्या याबाबत कॉंग्रेसचे ठरले आहे. उमेदवार यादीही अंतिम टप्प्यात आहे. आघाडीअंतर्गत ज्या चार ते पाच जागांचा तिढा आहे तो लवकरच सुटणार असून आठवडाराभा कॉंग्रेसची राज्यातील उमेदवार यादी जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीच्या बैठका झाल्या आहेत. चर्चा सुरू आहे. लवकरच त्यातूनही मार्ग काढला जाईल. आघाडी एकदिलाने लढणार असून मोठ्या संख्येने आघाडी जागा जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: congress candidate list for lok sabha will be announced within a week says minister balasaheb thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.