अल्पवयीन बालकास पळवून नेल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:40 IST2019-03-04T11:39:49+5:302019-03-04T11:40:14+5:30
नंदुरबार : अल्पवयीन बालकास पळवून नेल्याची फिर्याद बालकाच्या वडिलांनी शहादा पोलिसात दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ...

अल्पवयीन बालकास पळवून नेल्याची तक्रार
नंदुरबार : अल्पवयीन बालकास पळवून नेल्याची फिर्याद बालकाच्या वडिलांनी शहादा पोलिसात दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील बसस्थानक आवारातून प्रदीप हिरालाल माळी (14) या बालकाला 2 मार्च रोजी सायंकाळी कुणीतरी पळवून नेले. त्याचा ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आला नाही. त्यामुळे बालकाचे वडील हिरालाल किसन माळी, रा.सरस्वती कॉलनी यांनी याबाबत शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास फौजदार बडगुजर करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी व नातेवाईकांनी बसस्थानक परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासल्याचे सांगण्यात आले.