शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील उच्च शिक्षित तरुणाने केला ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

कोठार : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगाव तालुक्यातील रोषमाळ बु येथील उच्चशिक्षित असणाऱ्या संदीप पावरा यांनी ११ व्या शतकापासून ...

कोठार : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगाव तालुक्यातील रोषमाळ बु येथील उच्चशिक्षित असणाऱ्या संदीप पावरा यांनी ११ व्या शतकापासून ते आजपर्यंत चलनात असलेल्या ऐतिहासिक बरीच नाणी व नोटा संग्रहित केल्या आहेत. त्यांच्याकडे असलेला ऐतिहासिक ठेवा अद्याप दुर्लक्षित राहिला आहे.

सातपुड्याच्या आदिवासी भागात आजही कित्येक लोकांच्या घरात पुरातन नाणी संग्रहात आहेत. शिवाय नर्मदेच्या खोऱ्यात वसलेल्या अनेक ऐतिहासिक ठिकाणी पुरातन नाणी यापूर्वी देखील आढळून आल्या आहेत. सातपुड्याच्या कुशीत असलेला हा ऐतिहासिक ठेवा जपून ठेवण्याचा निर्णय संदीप पावरा धडगाव तालुक्यातील रोषमाळ बु येथील उच्च शिक्षित असणारा तरुण संदीप पावरा यांनी घेतला. त्यांनी इतिहास विषयात एमए पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे आपसुकच सातपुड्यातील ऐतिहासिक स्थळ,दस्तऐवज,नाणी,नोटा, व इतर सांस्कृतिक वारसा बाबत त्यांच्या मनात कुतूहल होते. या कुतूहलाने त्यांनी हा सातपुडा पर्वत रांगेत सापडणाऱ्या नाण्यांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. या ऐतिहासिक नाण्यांचे महत्त्व ते जाणून होते. सातपुड्यात ऐतिहासिक नाणी व इतर वस्तू असणाऱ्या लोकांची माहिती मित्र व नातेवाईक यांच्या मार्फत घेऊन त्या लोकांचा,त्यांच्या कुटुंबीयांचा ते शोध घेऊन ते त्या पर्यंत पोहाेचण्याचा प्रयत्न करतात.

११ व्या शतकापासून ते आजपर्यंत चलनात असलेली बरीच नाणी संग्रहित केली आहेत. या संग्रहात शिवकालीन नाणे,मुघलकालीन नाणे,इंग्रजांचे नाणे यांचा समावेश आहे. ऐतिहासिक नाण्यांचा संग्रहाबरोबर देश विदेशातील चलनी नाणी व नोटांचा संग्रह करण्यास संदीप यांनी सुरुवात केली. आज जवळपास ६० देशातील चालू चलनी नोटा व नाण्यांचा संग्रह संदीप यांच्याकडे आहे.

हा नाणी व नोटांचा संग्रह इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार असून भविष्यात हा संग्रह वाढविण्याचा व समृद्ध करण्याचा संदीप पावरा यांचा मानस आहे. संदीप पावरा यांनी सातपुड्यातील आदिम सांस्कृतिक वारसा इतिहास जतन करण्यासाठी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद असून शासन,प्रशासन व संस्था,संघटनाकडून त्यांना मदत मिळाली तर ते या क्षेत्रात अधिक भरीव कामगिरी करू शकतात.

उच्च शिक्षित तरुणांचा आदर्श

सातपुड्याच्या दुर्गम भागात वसलेल्या रोषमाळ बु सारख्या छोट्याशा गावातील संदीप पावरा यांनी इतिहास विषय पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. याशिवाय त्यांनी बीएडची पदवी देखील संपादित केली आहे. एमए बीएड पर्यंत उच्च शिक्षित असलेल्या तरुणाने नोकरी न मिळत असल्याने हताश न होता,कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शनाशिवाय स्वयंप्रेरणेने अशा प्रकारे ऐतिहासिक नाणी व नोटांचा संग्रह साकारून अनेक सुशिक्षित तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

मला स्वतःला यांचे संग्रह पाहून खूप मोठे आश्चर्य वाटले. अद्याप एवढा जवळ असून हा ऐतिहासिक संग्रह आमच्यापासून दूर होते. सातपुड्याच्या पर्यटनास यामुळं चालना मिळेल तसेच पडद्यामागे असलेला इतिहास यामुळं समोर येईल..

इंजि. प्रवीण पावरा,

सातपुड्यातील ऐतिहासिक स्थळांचे अभ्यासक