शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बँक व्यवहार बंदचा शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

शेतीकामे ठप्प होण्याला सर्वस्वी लॉकडाऊन कारणीभूत असून हे असेच ३० तारखेपर्यंत चालले तर पेरणी तोंडावर येऊन शेती पडीक तर ...

शेतीकामे ठप्प होण्याला सर्वस्वी लॉकडाऊन कारणीभूत असून हे असेच ३० तारखेपर्यंत चालले तर पेरणी तोंडावर येऊन शेती पडीक तर पडणार नाही ना? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यासाठी शासनाने शेतीसंबंधीची दुकाने दिवसभर उघडण्याची मुभा दिली; परंतु बँकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट हे पूर्ण व्यवसाय ठप्प करण्यासाठी कारणीभूत ठरत असून, याचा सर्वाधिक फटका हा शेती व्यवसायाला बसत आला आहे. त्याचबरोबर खतांच्या भावातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने बळिराजाचे आर्थिक नियोजन कोलमडताना दिसत आहे. शेतकरी अशा कठीण काळातही पोशिंदा बनून सर्वांची भूक भागवत असताना खर्चाच्या मानाने उत्पन्नाबाबत कमी पडत असताना भावाचे समीकरण जुळत नसतानाही या व्यवसायात टिकून आहे. सध्या खरीप पिकाची पेरणी तोंडावर येऊन ठेपली असून कडक लॉकडाऊनमुळे बँका व इतर सर्व शेतीसंबंधी दुकाने बंद असल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यातच बँका या ठरावीक वेळेत सुरू आहेत आणि या महिन्यात बँकांना शासकीय सुट्ट्या जास्त असल्यामुळे पीककर्जाविषयी कामे तसेच किरकोळ व्यवहार करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांचे बँकेत पैसे असताना आर्थिक व्यवहार सध्या बंद असल्याने ट्रॅक्टर व मजूर पैशांअभावी कामाला येणे टाळत आहेत. मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला असून, बँकेची कर्जप्रकरणेही लॉकडाऊनच्या नावाखाली बंद झाली असल्याने पेरणी कशी करावी? या चिंतेत सध्या शेतकरी असून, पेरणीलाच यावर्षी मुकावे लागते की काय? अशी परिस्थिती सध्या झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांची बागायतीला मूठमाती

आज अनेक शेतकऱ्यांनी भाजीपालावर्गीय पिकांची शेतात लागवड केली असताना अचानक १० दिवसांचा कडक लॉकडाऊन लागल्याने माल विकावा तरी कसा? या चिंतेने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांत ट्रॅक्टर फिरविला आहे. अगोदरच लागलेला खर्चही निघाला नसताना ही परिस्थिती ओढवल्याने पुन्हा बागायती नकोच म्हणून त्यांनी घरातच बसणे पसंत केले आहे.

बँक व्यवहार बंदचा सर्वाधिक फटका

शेतकरी वर्ग हा जवळपास रोखीने सर्व व्यवहार करीत असल्याने व हा वर्ग अजूनही ऑनलाइन जमान्यात खूप मागे असल्याने बँका बंद राहणे त्यांच्यासाठी उपाशी राहण्यासारखे ठरते. सर्वाधिक बँक बंदचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे. बँकांचे व्यवहार बंद असल्याने ट्रॅक्टरच काय, मजूरही कामाला येत नसल्याने शेतीकामे ठप्प झाली आहेत.