शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात सराफा व्यावसायिकांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील सोनार गल्लीतील सराफा व्यावसायिकाला झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी सोनार व्यापारी असोसिएशनतर्फे बंद ठेवून तहसीलदार ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील सोनार गल्लीतील सराफा व्यावसायिकाला झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी सोनार व्यापारी असोसिएशनतर्फे बंद ठेवून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना आरोपींना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.शहरातील सोनार गल्लीतील स्टार गोल्ड या दुकानाचे मालक यतीन शरदचंद्र सोनार यांनी 2016 मध्ये संशयित सलीम शेख यांच्याशी शेतीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. या विक्रीपोटी असलेली रक्कम देऊनही बुधवारी सकाळी आरोपी व त्यांचे नातेवाईकांनी दुकानावर येऊन सोनार यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही वेळाने सलीम शेख याने आपल्या कुटुंबांसह इतरांना जमा करून सोनार व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून दुकानाची नासधूस केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील सराफ असोसिएनने बंद पाळून आरोपींना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. या वेळी विलास सोनार, अमित सोनार, हेमंत सोनार, प्रवीण सोनार, संजय सोनार, किशोर वर्मा, हेमराज जैन, कुणाल सोनार,  राकेश सोनार, अश्विन सोनार, प्रकाश सोनार, राम जाधव, कचरूलाल नहाटा यांच्यासह शहर व तालुक्यातील सराफ व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सराफा व्यावसायिक उपस्थित होते.दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे व पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी सराफ बाजारात जाऊन व्यवसायिकांची चर्चा केली व आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे व्यापा:यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असून भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सराफ व्यापारी असोसिएशनचे विनोद शंकर सोनार यांनी केली आहे.