शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘टायगर जिंदा’ असल्याचा पुन्हा दावा़!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळ साक्री-नंदुरबार रस्त्यावर पट्टेदार वाघ दिसल्याची माहिती बुधवारी सोशल मिडियातून व्हायरल करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळ साक्री-नंदुरबार रस्त्यावर पट्टेदार वाघ दिसल्याची माहिती बुधवारी सोशल मिडियातून व्हायरल करण्यात आली होती़ या माहितीनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती़ दरम्यान दोन महिन्यांपासून नंदुरबार व नवापुर तालुक्यात पट्टेदार वाघाचा संचार असल्याची माहिती वारंवार दिली जात असल्याने जिल्ह्यात ‘टायगर जिंदा’ असल्याच्या दाव्याला बळकटी मिळत आहे़बुधवारी रात्री साक्रीकडून नंदुरबारकडे येणाऱ्या चौघांना सिंदबन घाटात चालत्या वाहनातून वाघ दिसल्याची माहिती आहे़ त्यांनी ही माहिती सोशल मिडियातून दिल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे़ दरम्यान वनविभागाने हा दावा खोडून काढत पट्टेदार वाघाचे कोणत्याही प्रकारचे निशाण जिल्ह्यात नसल्याचे म्हटले आहे़ परंतू वनविभागाच्या या नकारानंतरही हा वाघ दिसल्याचा दावा फोल ठरत नसल्याचे स्पष्ट होत असून गेल्या दोन महिन्यात नवापुर तालुक्यातील नवागाव, खांडबारा, सुकवेल, नंदुरबार तालुक्यातील काही गावांमधून वाघ दिसत असल्याचे दावे करण्यात आले आहेत़ यामुळे या भागात पट्टेदार वाघ आहे किंवा कसे हे पडताळून पाहण्यासाठी वनविभाग ट्रॅप कॅमेरे लावणार आहे़ ठाणेपाड्यासह विविध भागात लावल्या जाणाºया या कॅमेºयात वाघाची छबी येत्या काळात दिसल्यास जिल्ह्यात वाघाची ‘रिएंट्री’ झाल्याचे स्पष्ट होणार आहे़जिल्ह्यात वर्षभरापासून सुरु असलेल्या दाव्यांनंतरही वनविभाग वाघाचा संचार असल्याचे मान्य करत नसल्याचे वनक्षेत्रात राहणाºया नागरिकांचे म्हणणे आहे़ परंतू वनविभागाच्या म्हणण्यानुसार वाघाचे जिल्ह्यातील अस्तित्त्व हे सुखावणारे राहणार असून त्यातून जिल्ह्यातील वनविकासाला अधिक बळकटी येणार आहे़आगामी आठ ते दहा दिवस दोन्ही तालुक्यात लागणाºया ट्रॅप कॅमेऱ्यांची सत्यता समोर आल्यानंतर वाघ आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार असले तरी ठाणेपाड्यात दिसलेला प्राणी हा बिबट्या असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे़ठाणेपाडा येथे रस्त्यावर दिसून आलेला प्राणी बिबट्या असल्याचे वनविभाग सांगत असून वनक्षेत्रातील एका ठिकाणी बिबट्या बसल्याचा फोटोही त्यांच्याकडून देण्यात आला आहे़ वनक्षेत्रात फिरणारा हा बिबट्या पूर्ण वयस्कर असून लांबवरुन पाहिल्यास वाघासारखाच भासत असल्याचे सांगण्यात आले आहे़ एकीकडे वनविभाग ठामपणे नकार देत असताना नवापुर तालुक्यातील खांडबारा आणि नवागाव परिसरात वाघ असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला होता़ यानंतर याठिकाणी बºयाच दिवसांपासून शोध मोहिम सुरु आहे़ परंतू अद्याप वाघाचे कोणतेही जाणवले नसल्याचे वनविभाग सांगत आहे़नंदुरबार पालिकेचे नगरसेवक अ‍ॅड़ चारुदत्त कळवणकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पुखराज जैैन यांनी वाघ पाहिल्याची माहिती सोशल मिडियातून दिली होती़या माहितीनंतर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक जी़आऱ रणदिवे यांनी सांगितले की, या भागात दिसून आलेला प्राणी हा बिबट्या आहे़ तरीही सतर्कता म्हणून या भागात आठ ते १० ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत़ वनविभागाने ठाणेपाडा वनसंरक्षण समितीची बैठक घेत त्यांना वाघाच्या संचाराबाबत सूचना केल्याची माहिती देण्यात आली आहे़