शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

विधी संघर्ष बालकाने पोलिसांसमोर काढून दिला ४६ हजारांचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोबाईल चोरीचा तपास करत असताना हाती लागलेल्या विधी संघर्ष बालकाने पोलीसांच्या भितीने गर्भगळीत होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोबाईल चोरीचा तपास करत असताना हाती लागलेल्या विधी संघर्ष बालकाने पोलीसांच्या भितीने गर्भगळीत होऊन थेट दुचाकीसह ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून देत चोरीची कबुली दिली़ एलसीबीचे पथक शहादा शहरातील मोबाईल दुकानाच्या चोरीचा तपास करत असताना सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा माग काढण्यात यश आले होते़शहादा येथील काशिनाथ भाजीपाला मार्केट येथे टेकसिटी मोबाईल दुकान अज्ञात चोरट्याने फोडल्याने १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आले होते़ चोरट्याने १८ हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख रक्कम चोरुन नेली होती़या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची एलसीबीच्या पथकाने तपासणी केली असता, अज्ञात चोरटा दुकानात प्रवेश करत असल्याचे दिसून आले होते़ याप्रकरणी शहादा पोलीसात गुन्हा दाखल होता़ एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी याचा तपास सुरु केला होता़ दरम्यान पोलीस निरीक्षक नवले यांच्यासह पथकाने शहाद्यात तपास सुरु केला होता़ दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरटा पहाटे अज्ञात चोरटा शहादा अमरधाम परिसरात लपून असल्याची माहिती त्यांना मिळाली होती़ त्यांनी तातडीने पथकासह तेथे भेट देत चोरट्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले होते़दरम्यान त्याची चौकशी करण्यापूर्वीच ‘मारु नका मी सगळं सांगतो’ असा गयावया करत पोलीसांसमोर ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, २ हजार ८०० रुपये रोख, ३ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल काढून दिला़ अल्पवयीन असलेल्या विधी संघर्ष बालकाने शहादा शहरातच आठ ते नऊ ठिकाणी चोरी केल्याची माहिती समोर आली असून दोन गुन्हे उघडकीस आले असल्याचे सांगण्यात आले आहे़ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल दिपक गोरे, पोलीस नाईक विकास अजगे, विजय ढिवरे यांच्या पथकाने केली़