शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी मोफत होते केमोथेरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:24 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शरीरांतर्गत पेशींची अनियंत्रित वाढ झाल्याने निर्माण होणाऱ्या गाठी म्हणजेच कॅन्सर होय़ ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शरीरांतर्गत पेशींची अनियंत्रित वाढ झाल्याने निर्माण होणाऱ्या गाठी म्हणजेच कॅन्सर होय़ यावर मात करण्यासाठी येणारा खर्च परवडणारा नसल्याने अनेकांना अकाली मरण आले आहे़ जिल्ह्यातील कॅन्सर पिडितांवर ही वेळ येऊन येऊ यासाठी मोफत केमोथेरपी देण्याचा प्रयोग जिल्हा रुग्णालयाने गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरु केला होता़ यात प्रामुख्याने ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरने पिडित असलेल्या महिला रुग्णांना जीवदान देणे या उपचारांमुळे शक्य झाले आहे़अपुºया आरोग्य सुविधांमुळे सतत चर्चेत राहणाºया नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात बºयापैकी बदल घडून आले आहेत़ यात जिल्हा सामान्य रुग्णालयात ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरने पिडित असलेल्या महिलांना हात देत मोफत केमोथेरपी देणे सुरु केले आहे़ गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या या उपचार पद्धतीचा आतापर्यंत ६८ स्थानिक महिला रुग्णांनी लाभ घेतला असून बाहेरच्या जिल्ह्यातील २० च्या जवळपास महिला रुग्ण केमोथेरपीसाठी येऊन गेल्या आहेत़ रुग्णालयाने मोफत सुरु केलेली ही पद्धती इंजेक्शन स्वरुपात असल्याने रेडिऐशनचे धोके यात महिला रुग्णांना अनुभवास येत नाहीत़ संपूर्ण मोफत असलेल्या या सुविधेचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना होत असून उपचारासाठी बाहेरगावी होणारी परवड यातून थांबली आहे़ सातपुड्याच्या दुर्गम व अती दुर्गम भागासह सपाटीच्या तालुक्यातील महिला रुग्णांनी या उपचार पद्धतीचा गेल्या सहा महिन्यात वेळोवेळी लाभ घेतला आहे़विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक वर्षांपासून ब्रेस्ट कॅन्सर व गर्भाशयाच्या कॅन्सरवर उपचार करुन महिला रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात़ यातून गेल्या पाच वर्षात ११० महिला रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे़ यांतर्गत आता केमीथेरपीचाही पर्याय उपलब्ध झाल्याने शस्त्रक्रिया करण्यापूर्वी उपचार देणे सोपे झाले आहे़ महिला रुग्णांसोबत प्रशासनाने गेल्या महिन्यात चार पुरुष रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे पाठवले होते़ चारही रुग्ण तोंडाच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत़ त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या पुढाकाराने मोफत उपचार झाले आहेत़मॅमोग्राफीनंतर महिला किंवा पुरुषांच्या शरीरातील कॅन्सरच्या गाठींचे वर्गीकरण करण्यात आल्यानंतर किमोथेरपी करण्याचा निर्णय घेतला जातो़ नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वी ही उपचार पद्धती नसल्याने रुग्णांना गुजरात किंवा नाशिक, मुंबईचा रस्ता धरावा लागत होता़ यातील खर्च आणि माहिती याचा अभाव असल्याने त्यांच्यासह कुटूंबियांचेही हाल होत होते़ रुग्णांच्या या समस्यांवर लक्ष देत जिल्हा रुग्णालयाने केमीथेरपी उपचार पद्धती सुरु केली़ दुसºया टप्प्यातील कॅन्सरसोबत शेवटच्या टप्प्यातील कॅन्सरही यातून आटोक्यात येतो़ इंजेक्शनद्वारे करण्यात येणाºया या उपचारांचा खासकरुन महिला रुग्णांना लाभ झाला आहे़ जिल्ह्यात खाजगी आणि सामान्य रुग्णालयात दर आठवड्याला किमान दोन रुग्णांची नॅनोग्राफी चाचणी करण्यात येते़ यातून कॅन्सरबाबत माहिती समोर आल्यानंतर त्यांच्याकडून उपचारासाठी केमोथेरपीचा अवलंब करण्यात येतो़ महिलांमधील गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण कमी झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे़ तर ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात आले असून महिन्याला किमान दोन महिलांवर किमोथेरपी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे़जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ आऱडी़भोये व अतीरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ के़डी़सातपुते यांच्या मार्गदर्शनात सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या या उपक्रमात लगतच्या धुळे जिल्ह्यासह गुजरात राज्यातील महिला रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ उपचार पद्धतीत बदल करुन योग्य ती साधने उपलब्ध व्हावीत यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करुन निधीची उपलब्धता करुन घेण्यात आल्याने सहा महिन्यात एकदाही ही सेवा बंद पडलेली नाही़ जिल्हा रुग्णालयानंतर शहरातील मेडिकेअर हॉस्पिटल्स या एकमेव ठिकाणी केमोथेरपी उपचार देण्यात येतो़ याठिकाणी कॅन्सरपिडित महिलांसाठी काम करणाºया सेवाभावी संस्थांकडून मदत उपलब्ध करुन उपचार देण्यात येत आहेत़