शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मयत महिलेची जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काथर्दे, ता. शहादा शिवारात प्राची विकास मोहिते (रा.वसई, जि.पालघर) यांच्या आजी वासंतिकाबाई दामोदर जोशी ...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काथर्दे, ता. शहादा शिवारात प्राची विकास मोहिते (रा.वसई, जि.पालघर) यांच्या आजी वासंतिकाबाई दामोदर जोशी यांच्या मालकीची वडिलोपार्जित व कब्जे उपभोगातील ६ हे. ६९ आर. एवढी शेतजमीन आहे. त्यांच्यातर्फे विश्वास श्रीकृष्ण पाटील (रा.डामरखेडा) हे या शेतजमिनीची खेड व मशागत करतात. तसेच विश्वास पाटील हे त्यांचे जनरल मुखत्यारदेखील आहेत. प्राची मोहिते यांचे लग्नापूर्वीचे नाव प्राची विश्वनाथ जोशी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दामोदर जोशी असे तर आजीचे नाव वासंतिका दामोदर जोशी असे होते. वासंतिका जोशी यांचे ११ ऑक्टोबर २००३ रोजी मुंबई येथे निधन झाले असून तसा मृत्यू दाखलादेखील आहे. असे असताना एका अज्ञात महिलेस वासंतिका जोशी जिवंत असल्याचे भासवून व त्यांचे विशेष कुलमुखत्यार असल्याचे भासवून ४ मे २०१८ रोजी शहादा दुय्यम निबंधक कार्यालयात मयत वासंतिका जोशींच्या शेतीचे खरेदी खत राहुल मोतीराम निकम (लिहून देणार) याने राजेंद्र विष्णू इंगळे ( लिहून घेणार) याच्या नावाने खरेदी खत नोंदवून दिले आहे. संबंधित तोतया महिलेस प्रशांत कृष्णराव जोशी याने संगनमत करून त्याचे रेशनकार्डात वासंतिका जोशी वय ७८, काकू असे नाव समाविष्ट केल्याचे आणि त्याआधारे खोटे व बनावट आधारकार्ड तयार केल्याचे तक्रारदार विश्वास पाटील यांना माहितीच्या अधिकारात माहिती मिळाली आहे. बनावट खरेदी खताच्या आधारे शेतीच्या नावात फेरफार नोंद होऊ नये म्हणून तक्रारदार पाटील यांनी तहसीलदार शहादा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी कलसाडी यांना चौकशीचे आदेश दिले असता मंडळ अधिकाऱ्यांनी संबंधित वासंतिका जोशी ही महिला तोतया आहे किंवा नाही याबाबत तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्याबाबतचा अहवाल तहसीलदारांना दिला होता. याप्रकरणी सदर तोतया महिला व या गुन्ह्यात तिला साथ देणाऱ्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार यांनी पोलीस निरीक्षक शहादा यांना ६ फेब्रुवारी २०२० रोजी रजिस्टर पोस्टाने फिर्याद पाठवूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने २४ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनाही फिर्याद पाठविण्यात आली. मात्र त्यांच्याकडूनही कार्यवाही न झाल्याने अखेर तक्रारदार विश्वास पाटील यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शहादा यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ॲड. प्रीतेश जैन यांनी न्यायालयात फिर्यादीतर्फे बाजू मांडली. याप्रकरणी न्यायालयाने संबंधित तोतया महिला, राहुल निकम, राजेंद्र इंगळे व प्रशांत जोशी यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ४०४, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश शहादा पोलिसांना दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशान्वये चौघांवर पोलिसात गुन्हा दाखल

फिर्यादी विश्वास पाटील यांच्या बाजूने निकाल देत न्यायालयाने चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार शहादा पोलिसात तोतया महिला, राहुल निकम, राजेंद्र इंगळे व प्रशांत जोशी या चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात बनावट रेशनकार्ड, आधारकार्ड तयार करणाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता असल्याने पोलीस तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.