चोरीला गेलेल्या दीड लाखांची जबाबदारी घेत जपला मैत्रीचा अनोखा बंध..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:41 IST2019-11-15T12:41:33+5:302019-11-15T12:41:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : चोराने एक लाख 60 हजार रुपयांवर एकीकडे हात साफ करुन पोबारा केला तर दुसरीकडे ...

Chanting the unique bond of friendship, taking responsibility for one and a half lakhs stolen .. | चोरीला गेलेल्या दीड लाखांची जबाबदारी घेत जपला मैत्रीचा अनोखा बंध..

चोरीला गेलेल्या दीड लाखांची जबाबदारी घेत जपला मैत्रीचा अनोखा बंध..

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : चोराने एक लाख 60 हजार रुपयांवर एकीकडे हात साफ करुन पोबारा केला तर दुसरीकडे संबंध जपतांना चोरीस गेलेली रक्कम स्वत: भरुन देण्याची तयारी मित्राने दर्शवली. गुरुवारी दुपारी बसस्थानकासमोर हा प्रकार घडला.
शहरातील छोटू चौधरी या युवकाने एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतून गुरुवारी दुपारी दोन लाख  90 हजार रुपयांची रक्कम काढली. शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन ते बसस्थानकासमोरील परिचयातील पिंटू भरवाड यांच्या दुकानावर आले. काढलेल्या  रकमेपैकी एक लाख 30 हजार रुपयांचा भरणा त्यांना अन्य खाजगी बँकेत करावयाचा असल्याने एक  लाख 60 हजार रुपये पिंटू भरवाड यांना देऊन ते बँकेत निघून गेले. रकमेचा भरणा करुन निघत असताना त्यांना ठेवलेले एक लाख 60 हजार रुपये चोरीस गेल्याचा दूरध्वनी संदेश प्राप्त झाला. बसस्थानक परिसरात कार्यरत सीसीटीव्ही कॅमे:याच्या सहाय्याने गजबजलेल्या दुकान व परिसरातून कुणी एवढी रक्कम नेली याचा मागोवा  घेण्याचा प्रय} करण्यात आला. मात्र तो प्रय} अयशस्वी ठरला. अज्ञात चोरटय़ाने रक्कम लांबवल्याचे स्पष्ट झाले. चोरटय़ाने हात साफ  करुन रक्कम लांबवली मात्र भरोसा ठेवून आपल्याकडे ठेवलेली  रक्कम चोरीस गेल्याने ती रक्कम  भरुन देण्याचे आश्वासन पिंटू  भरवाड यांनी छोटू चौधरी यांना दिल्याने पोलिसांर्पयत ही बाब नेण्यात आली नाही. वर्दळीच्या बसस्थानकासमोरील दुकानात हा प्रकार घडल्याने चोरटय़ांविषयीच्या भितीत शहरात वाढ झाल्याचे चित्र आहे.
 

Web Title: Chanting the unique bond of friendship, taking responsibility for one and a half lakhs stolen ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.