शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

नंदुरबार - शहरातील राजे शिवाजी विद्यालय, विद्यासागर पब्लिक स्कूल व ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या पटांगणावर प्रजासत्ताक ...

नंदुरबार - शहरातील राजे शिवाजी विद्यालय, विद्यासागर पब्लिक स्कूल व ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या पटांगणावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी दगाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक रवी पाटील, विद्यासागर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल पायल मंदाना तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद हायस्कूल, नंदुरबार

नंदुरबार येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वामी विवेकानंद हायस्कूल व प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व कोरोना योध्दा देवेंद्र भरत माळी व ललिता माळी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुलाब महाजन व सचिव देवेंद्र माळी यांच्या हस्ते स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर संस्थेतर्फे विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त प्राचार्य रोहिदास साळुंखे, माजी सैनिक भरत गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीमुळे सन्मान करण्यात आला. तसेच परिसरातील प्रगतिशील शेतकरी बाबूलाल शिवराम माळी व विजय माळी यांच्या प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. हॉटेल व्यवसायात प्रगतिपथावर असलेले पुंडलिक माळी तसेच धनराज माळी यांचाही संस्थेतर्फे गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे कोविड १९ च्या कालावधीत कोविड योद्धा म्हणून कार्य केलेले स्वामी विवेकानंद हायस्कूलचे उपशिक्षक प्रवीण सोनवणे, सिद्धांत माळी, प्राथमिक शाळेचे उपशिक्षक दीपक चौधरी यांचा कोविड योद्धा म्हणून संस्थेतर्फे गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी सोनल महाले यांनी संविधान सादर केले. दरम्यान मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष गुलाब महाजन, सचिव देवेंद्र माळी, संचालक प्रमोद बागुल, कैलास माळी, भरत माळी, खजिनदार देविदास माळी, वासुदेव माळी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालिका सुनंदा माळी, वंदना माळी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नीता चौरे, सर्व शिक्षक व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक निंबा माळी तर आभार मुख्याध्यापक एन.जी. भावसार यांनी मानले.

देवमोगरा माध्यमिक विद्यालय, वसलाई

नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथील देवमोगरा माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच आशाबाई जयंत वळवी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक हेमंत खैरनार, उपशिक्षक हिरालाल लिंगायत, संजय दातीर, हेमंतकुमार पाडवी, दिलीप वळवी, सुनील वाळवी, स्वप्ना पाटील, कारभारी पाटील, गणेश राजपूत, सुदाम गोराणे, टीकाराम पाडवी, मनेश वसावे, शैलेंद्र वळवी, बिंदुबाई वळवी, अनिता वळवी, विजया पाडवी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रदीप पाटील,पायला पाडवी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य मांगीलाल वळवी, जितेंद्र वळवी, ग्रामसेवक, गावातील सदस्य मनोज शिवाजी वळवी, इंद्रनाथ वळवी, महेंद्र वळवी, संदेश सुरुपसिंग वळवी, कांतीलाल वळवी आदी उपस्थित होते.

वनवासी विद्यालय, चिंचपाडा

चिंचपाडा - नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी.चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यवेक्षिका एन.एम. गांगुर्डे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्राचार्य बी.एम. निकुंभ, अंटीपाड्याचे जयसिंग गावीत, लता शिवदे, विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ऑनलाईन देशभक्तीपर गीते सादर केली. प्रा.आर.डी. सोनवणे, प्रदीप देसले यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. गीतांना संगीतबद्ध करण्याचे कार्य ए.एस.पाडवी, एस.एस. महाले व त्यांच्या टीमने केले. प्राथमिक विभागाच्या उपशिक्षिका अपर्णा शिवदे यांनी स्वत: व विद्यार्थिनींकडून रांगोळी काढून परिसर सुसज्ज केला. सूत्रसंचालन अशोक पाडवी यांनी केले.

प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल, शहादा

शहादा - सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहादा येथील प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात विविध विद्या शाखांतर्फे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव, समन्वयक संजय राजपूत, प्राचार्य सुनील सोमवंशी, प्राचार्य डाॅ.ए.एन. पाटील, प्राचार्या एस. झेड. सय्यद, प्रभारी प्राचार्य डाॅ.भारत चालसे, हिमांशू जाधव यांचेसह सर्व विद्या शाखांचे पदाधिकारी, शिक्षक, सहकारी उपस्थित होते. यानंतर वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालयाच्या वेबसाईटचे उद्घाटन प्रा.संजय जाधव व वर्षा जाधव यांचे हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन एन.बी. कोते यांनी केले.