शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयने फरदडचीही खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत लॉकडाऊन दरम्यान सीसीआयतर्फे शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. उच्च ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत लॉकडाऊन दरम्यान सीसीआयतर्फे शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. उच्च प्रतीच्या कापसाला प्रती क्विंटल पाच हजार ३५५ रुपये भाव दिला जात असून चार मे पासून आतापर्यंत शहादा येथील केंद्रावर तीन हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. आजअखेर तालुक्यात किमान ५० हजार क्विंटल उच्च दर्जाचा त्याचप्रमाणे १० हजार क्विंटल फरदड कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचा अंदाज वर्तविला जात असून शासनाने फरदड कापसाची खरेदी करावी, अशी मागणी केली जात आहे.शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सीसीआयच्या केंद्रावर २१ मार्चपर्यंत तालुक्यातील सुमारे एक लाख ७८ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. दरम्यान देशात व राज्यात कोरोना विषाणू संक्रमणाचे संकट आल्याने कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. यामुळे अनेक शेतकºयांकडे कापूस शिल्लक राहिला होता. शासनाने हा कापूस खरेदी त्वरित सुरू करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह शेतकºयांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार ४ मे पासून शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.४ ते ११ मे दरम्यान या केंद्रावर सुमारे तीन हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. बाजार समितीकडे आजपर्यंत सुमारे दोन हजार शेतकºयांनी कापसाची नोंद केली असून त्यानुसार तालुक्यात किमान ५० हजार क्विंटल उच्च दर्जाचा कापूस हा शेतकºयांच्या घरात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. हा संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी दिली. बाजार समितीत नोंद केलेल्या दररोज ५० शेतकºयांना कापूस विक्रीसाठी बोलाविले जाते. सोशल डिस्टन्स पालन करून एकावेळी १० गाड्यांचे मोजमाप केले जाते.सीसीआयच्या केंद्रावर केवळ उच्च दर्जाच्या कापसाची खरेदी होत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक शेतकºयांकडे शेवटचा कापूस हा फरदड, कवडी या स्वरूपात असून हा अंदाजे तालुक्यात १० हजार क्विंटलपेक्षा अधिक असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या शेवटच्या कापसाची खरेदी शासनाने करावी. केवळ एकाच ग्रेडचा कापूस खरेदी न करता शेवटच्या कापसाला योग्य तो भाव देऊन शासनाने खरेदी करायलाच पाहिजे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. खुल्या बाजारात उच्च प्रतीच्या कापसासह शेवटच्या कापसाला अत्यंत कमी भाव दिला जात असल्याने शेतकºयांचा ओढा कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे वाढला आहे.कोरोना विषाणू संकटानंतर खुल्या बाजारात कापूस खरेदी मध्य प्रदेशातील खेतिया बाजार समितीत सुरू झाली असली तरी व्यापाºयांकडून भाव अत्यंत कमी असल्याने शेतकºयांना त्याची विक्री करणे परवडत नाही. सीसीआयतर्फे केवळ उच्च दर्जाच्या कापसाची खरेदी होत असल्याने शेवटच्या कापसाचे करावे काय? या विवंचनेत कापूस उत्पादक शेतकरी आहेत.केंद्र शासनाच्या आदेशानुसार सीसीआय केंद्रावर केवळ उच्च दर्जाच्या कापसाची (एफएक्यू) खरेदी केली जात आहे. शासनाने केवळ या ग्रेडच्या कापसाची खरेदीची परवानगी दिली असल्याने शेतकºयांनी असाच कापूस केंद्रावर विक्रीसाठी आणावा. तालुक्यातील सर्वच शेतकºयांचा कापूस खरेदी करण्यासाठी केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे.-सुनील पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा.शेतकºयांकडे शिल्लक राहिलेल्या कापसाची नोंदणी बाजार समितीमार्फत करण्यात आलेली असून त्यानुसार आदल्या दिवशी प्रत्येक शेतकºयाला दूरध्वनीद्वारे सूचना केली जाते की, त्यांनी केंद्रावर आपला कापूस विक्रीसाठी आणावा. अद्यापपर्यंत ज्या शेतकºयांनी नोंदणी केली नाही अशांनी त्यांच्याकडे असलेल्या कापसाची नोंदणी करावी. केवळ उच्च दर्जाच्या कापसाची खरेदी करण्याचे शासनाचे आदेश असल्याने अनेक अडचणी येत आहेत. ग्रेडर व शेतकºयांचे वाद होत असून केंद्र चालवायला अडचणीत येत आहेत.-संजय चौधरी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा.