शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

‘बंटी और बबली’ स्टाईल दोघांनी केली जबरी चोरी, महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:37 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  लोणखेडा, ता.शहादा येथे बंटी और बबलीने घरात घुसत महिलेला चाकूचा धाक दाखवून रोख ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  लोणखेडा, ता.शहादा येथे बंटी और बबलीने घरात घुसत महिलेला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम रुपये लंपास केल्याची घटना ८ रोजी रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भर वस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. बंटी और बबली चित्रपटाला शोभेल असा प्रकार लोणखेडा येथे ८ रोजी रात्री घडला. नंदलाल दिलीप पाटील, रा.बॅंक ऑफ इंडिया जवळ यांच्या घरात रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान दुचाकीवर एक जोडपे आले. घराच्या पुढील हॅालमध्ये पाटील यांची आई लताबाई पाटील या बसलेल्या होत्या. तर पुढील रुममध्ये नंदलाल पाटील व परिवार टीव्ही पहात होते. दुचाकीवर आलेल्या दोघांनी थेट घरात प्रवेश केला. लताबाई यांना कुणी पाहुणे आले असतील म्हणून त्यांनी त्यांच्याकडे पाहिले. परंतु तोंडाला स्कार्फ बांधलेल्या महिलेने व पुरुषाने लताबाई  यांना काही कळण्याच्या आत त्यांना चाकूचा धाक दाखविला. अंगावरील दागीने काढून देण्याचे सांगितले. कपाटाच्या चाव्या मागितल्या. लताबाईंनी हाताच्या इशाराने पाकिट दाखविले. यावेळी त्यांनी लताबाई पाकिटात असलेले साडेतीन हजार रुपये त्यांनी काढून घेतले.सोने काढून द्यावे म्हणून मारहाण देखील केली. कपाटाकडे दोघे जाणार तोच त्यांना घरात कुणीतरी असल्याची चाहुल लागली. त्यानंतर ते तेथून पसार झाले. परिवारातील सदस्य हॅालमध्ये आल्यावर त्यांना लताबाईच्या तोंडात कापडाचा बोळा दिसला. लागलीच पाटील यांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर शहादा पोलीस ठाण्यात नंदलाल पाटील यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अंदाजे ४० वर्षीय जोडप्याविरुद्ध जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार विक्रांत कचरे करीत आहे. लोणखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या, दुचाकी लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर थेट बंटी-बबली बनून जबरी चोरी करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लोणखेडा येथे पोलीस चौकीची मागणी होत आहे.