लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शेतकरी राजासाठी महत्त्वाचा असलेला पोळा हा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकरी खरेदीसाठी बाजारात दाखल न झाल्याने विक्रेत्यांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा लागली आहे.शेत शिवारामध्ये शेतकºयाच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाºया सर्जा राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. हा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांकडून या सणासाठी लागणाºया वस्तूंची खरेदी झालेली नसल्याचे दिसून येते. शहादा शहरात विविध भागातून पोळा सणानिमित्त बैलांच्या सजावटीसाठी व वर्षभर लागणाºया इतर वस्तू विक्रीसाठी दाख झालेल्या विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पोळा हा सण काही दिवसांवर आला असूनदेखील कोरोनाच्या भीतीपोटी शेतकरी शहरात खरेदीसाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे बैलांसाठी लागणारे विविध साहित्य व साज विक्रेत्या व्यापाºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. दरवर्षी पोळा सण उत्साहाने साजरे करण्यासाठी शेतकºयांकडून दोरखंड, नात, मोरखी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा आदी साहित्य खरेदी करण्याची लगबग असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे शेतकरी बाजारपेठेत दिसत नाही.
बैलांचा साज विक्रेत्यांना शहाद्यात ग्राहकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 13:06 IST