लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोठली येथे कौटूंबिक वादातून महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली़ महिलेवर उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे़कुशीबाई तुकाराम पवार यांचा भुरीबाई भामू वसावे व भामू माकड्या वसावे दोघे रा़ कोठली यांच्यासोबत कौटूंबिक वाद होता़ कुशीबाई ह्या भुरीबाई व भामू वसावे यांच्या मुलीच्या सासू असल्याने तिला घरात का राहू देत नाहीत, या कारणातून वाद झाला होता़ यातून वसावे दाम्पत्याने कुशीबाई यांच्या डोक्यात वीट टाकून काठीने मारहाण करत जखमी केले होते़याबाबत कुशीबाई यांच्या फिर्यादीवरुन वसावे दाम्पत्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बोरसे करत आहेत़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}