पारंपारिक बियाणे संवर्धन व संशोधनावर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:43 AM2019-01-13T11:43:33+5:302019-01-13T11:43:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : : भारतासारख्या कृषी प्रधान देशात पारंपारिक बियाण्यांद्वारा केलेले शेती उत्पादनाला तोड नव्हती. परंतु गेल्या ...

Brainstorming on conventional seed culture and research | पारंपारिक बियाणे संवर्धन व संशोधनावर मंथन

पारंपारिक बियाणे संवर्धन व संशोधनावर मंथन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : : भारतासारख्या कृषी प्रधान देशात पारंपारिक बियाण्यांद्वारा केलेले शेती उत्पादनाला तोड नव्हती. परंतु गेल्या 20 ते 25 वर्षात परदेशी कंपन्यांनी भारतातील शेती परंपरेचा कणा मोडीत काढत शेतीचक्रच बदलवल्याचा सूर शेतक:यांनी संरक्षीत केलेल्या बियाणे, वाणांचे जतन, संरक्षण व प्रचार-प्रसाराकरीता आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले. दरम्यान, यानिमित्त  विविध राज्यातील परंपरागत बियाण्यांचे भव्य प्रदर्शन मांडण्यात आले असून त्यालाही शेतकरी व संशोधकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अक्षय कृषी परिवार, डॉ.हेडगेवार सेवा समिती व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदीरात आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय ग्राम विकास प्रचारक संस्थेचे डॉ.दिनेशजी, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा, महाराष्ट्र जैव विविधता बोर्डाचे अध्यक्ष डॉ.विलास बोर्डेकर, नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, केंद्रीय केआरए बोर्डचे सदस्य डॉ.प्रकाश शास्त्री, रशिद गावीत, मनोज सोलंकी, डॉ.हेगडेवार समितीचे कृष्णदास पाटील, योजकचे अध्यक्ष डॉ.गजानन डांगे, डॉ.बी.गुणाकर आदी उपस्थित होते. 
चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या मुख्य भाषणात बोलतांना राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, शुद्ध बीज हेच जीवनाचा आधार आहे. मानवी जीवनावर चांगल्या बिजाचा परिणाम होतो. पाश्चात्य देशांनी आपल्या पारंपारिक बियाणे संकरीत करून त्यांचा मुळ गाभाच नष्ट केला आहे. हायब्रिडच्या नावाखाली ते खपविले जात आहे. कमी कालावधीत त्याचे जास्त उत्पादन येत असले तरी त्याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम दिसून येत आहे. शेतातील विविध वानांच्या बियाण्यांसह प्राण्यांमध्येही तीच बाब दिसून येत आहे. पूर्वी देशी जातीच्या गायी 25 ते 35 लिटर दूध देत होत्या. परंतु संकरीत गायींच्या जाती निर्माण करण्यात आल्या. त्यांचे दूध देण्याचे प्रमाण पाच ते 10 लिटरवर आले. काही दिवसातच त्या भाकड होऊ लागल्या. त्यामुळे पूर्वीच्याच देशी गायींच्या जातींचे संवर्धन करणेही गरजेचे असल्याचे आचार्य देवव्रत यांनी सांगितले. 
ते पुढे म्हणाले, परंपरागत शेती वाणांच्या बिजचे संवर्धन आणि संशोधन होणे आवश्यक आहे. आपण आपली परंपरागत बियाणे विसरलो तर परदेशी कंपन्यांच्या हायब्रिड बियाण्यांवर अवलंबून राहावे लागेल. आणि तोच या कंपन्यांचा हेतू आहे. त्यामुळे आताच सावध व्हा. आपल्या परंपरागत बियाण्यांमध्ये अधीक संशोधन करून त्यातून अधीक उत्पादन मिळविण्यासाठी प्रय} करा. अशा चर्चासत्रांच्या माध्यमातून देशभरातील एकमेकांच्या बियाण्यांचे आदानप्रदान करा आणि पूर्वीसारखाचा आपला कृषीप्रधान देशाची ओळख कायम ठेवा अशी अपेक्षाही राज्यपाल देवव्रत यांनी व्यक्त केली.
चर्चासत्राच्या स्वागत पर भाषणात महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी. विश्वनाथन यांनी सांगितले, राहुरी कृषी विद्यापीठाने नेहमीच पारंपपारिक बियाणे, त्यांचे संवर्धन आणि संशोधन याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी बियाणे विषयातील विद्यापीठाचे कार्य तसेच या संबंधातील आगामी दिशा याबाबत मार्गदर्शन केले.
 या प्रसंगी रा. स्व. संघाचे अखिल भारतीय ग्रामविकास प्रमुख डॉ दिनेश जी. यांनी भारतीय कृषी चिंतनांत बियाणे विषयाचे महत्व अधोरेखीत केले. चर्चा सत्रा करीता सामुहीक प्रय}ाचे स्वागत केले. महाराष्ट जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष. डॉ विलास बर्डेकर यांनी राष्टीय चर्चासत्र आयोजकांचे अत्यंत महत्वपुर्ण विषय हाती घेतल्याबद्दल अभिनंदन केले. व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बियाणे हा शेतीचा आत्मा आहे. बियाणांतील विवधता हा याचा गाभा आहे. हि विविधता आधुनिक काळातील विकास प्रक्रीयेने दुर्लक्षीत केली गेली. त्यामुळे यावर सामुहीक चिंतन मंथनाची आवश्यकता लक्षात घेवुन राष्टीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शेतक:यांचे बियाणे साभाळणे ही काळाजी गरज आहे असे प्रतिपादन चर्चासत्राचे आयोजक सचिव डॉ. गजानन डांगे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ.बी.गुणाकर यांनी केले. त्यानंतर विविध विषयांवर पेपर वाचन झाले. 
दरम्यान, रविवारी दुपारी या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप होणार असून केंद्रीय कृषीराज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 
राष्ट्रीय चर्चासत्राचे केंद्रबिंदू ठरलेल्या बियाण्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात महाराष्ट्र, गुजराथ, तेलंगाना, कर्नाटक, पंजाब ,हरियाना ,हिमाचल प्रदेश, अश्या विविध राज्यातून संशोधक शेतक:यांनी शेकडो प्रकारची बियाणे प्रदर्शनात मांडली. सातपुडय़ातील आदिवासी भागातील शेतक:यांनी त्यांनी संवर्धीत केलेल्या विविध जातीच्या वाणांची आणि शेती साहित्याचीही माहिती राज्यपाल व इतर मान्यवर संशोधकांनी जाणून घेतली.
 विविध राज्यातुन संशोधक शेतक:यांची उपस्थिती.  शेकडो प्रकारच्या बियाण्यांचे प्रदर्शन. विविध शास्त्रज्ञांची, सामाजीक कार्यकत्र्यांची उपस्थिती.
 उत्कृष्ठ जिल्हाधिकारी म्हणुन राज्यपाल महोदय यांच्या हस्ते डॉ मल्लीनाथ कलशेट्टी याचा सन्मान.  बिज संग्राहक राहीबाई पोपरे यांचा सन्मान.  जैवविविधता केद्र जतन करणारे रामसिंग वळवी यांचा सन्मान.
पारंपारिक बियाण्यांचा वापर, खतांचा मर्यादीत वापर आणि नैसर्गिक शेतीला प्राधान्य या   त्रिसुत्रीवर आधारीत शेतीत शेतकरी समाधानी होता. परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हायब्रिड बियाणे भारतात आणले. या बियाण्यांना खतांची उपलब्धता जास्त प्रमाणात लागते. किटकनाशकांची फवारणी जास्त करावी लागते. परिणामी पाण्याचे प्रमाणही जास्त लागते. यामुळे शेतीचक्र बदलले, उत्पादनात दरवर्षी तफावत निर्माण होऊ लागली परिणामी शेतक:याचे अर्थकारण बदलले. त्यामुळे शेतकरी कजर्बारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढू लागल्याचे राज्यपाल देवव्रत यांनी स्पष्ट केले. चर्चासत्राच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेती आणि पाणी यावरही विवेचन केले.

Web Title: Brainstorming on conventional seed culture and research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.