शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सदस्यांतर्गत धुसफूस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा नगरपालिकेची निर्विवाद सत्ता भाजपाकडे असली तरी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या दीड वर्षापासून अंतर्गत धुसफूस ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा नगरपालिकेची निर्विवाद सत्ता भाजपाकडे असली तरी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या दीड वर्षापासून अंतर्गत धुसफूस सातत्याने दिसून आली आहे. शुक्रवारच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळेच सभा तहकूब करण्याची नामुष्की घ्यावी लागल्याचे म्हटले जाते.काँग्रेसच्या कारभाराला कंटाळून सन २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत तळोदावासियांनी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह भाजपाचे तब्बल ११ नगरसेवक निवडून देवून एकहाती सत्ता भाजपाच्या स्वाधीन केली. साहजिकच स्थिर शासनामुळे विकासाच्या बाबतीत शहरवासीयांच्या आशादेखील पल्लवीत झाल्या होत्या. तथापि एक-दीड वर्षानंतरच सत्ताधाऱ्यांमधील आपसातील धुसफूस सातत्याने पुढे आली आहे. कधी विकास कामांवरून तर कधी कामांच्या ठेक्यावरून मतभेद झाल्याचे बोलले जाते.गेल्या १५ दिवसांपासून दोन्ही गटातील संबंधतर अधिकच ताणले गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाºयांमधील सुदोपसुदी दिसून आली. भाजपाचा एकही नगसेवक सभास्थळी साधा फिरकलादेखील नाही. साहजिकच त्यांच्यातील कटूता किती विकोपाला गेल्याचे दिसून येते. वास्तविक सर्वसाधारण सभेतील विषय पत्रिकेवरील दोन-तीन विषय विरोधकांशी निगडीत होते. त्याबाबत आपसात बसून चर्चा होऊ शकली असती अथवा विरोध केला असता. मात्र यावरून सभाच तहकूब करणे हे निश्चितच योग्य नाही. शहराच्या विकासाला खीळ घालण्याचाच प्रकार आहे. वास्तविक कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमिवर आघाडी सरकार अनेक योजनांना कात्री लावत आहे. एवढेच नव्हे आर्थिक अडचणींमुळे सर्वच विभागांना दिलेला निधीदेखील परत मागविला जात आहे, अशी वस्तुस्थिती असतांना विकास कामांचे सुयोग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मात्र सत्ताधारी अंतर्गत गटबाजीत रंगल्याचे चित्र आहे.गेल्या दीड-दोन वर्षाच्या कालावधीत शहरात विकासाची चांगली कामेदेखील झाली आहेत. यात विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेत कधीच विरोधी भूमिका घेतली नाही, वास्तविक विरोधकांनी त्यांच्या कारभारावर अंकुश ठेवणे अपेक्षित असतांना सत्ताधारीच एकमेकांचे पाय ओढत असल्याचे शुक्रवारच्या प्रकारावरून दिसून येते.गेल्या १० वर्षानंतर भाजपाला पूर्णबहुमत देत नागरिकांनी पालिकेच्या सत्तास्थानी बसविले आहे. त्याचा सदुपयोग पदाधिकाºयांनी विकास कामांमध्ये खर्च करण्याची अपेक्षा नागरिकांनाही लागून आहे. परंतु लहान सहान गोष्टी, मानपानावरून सुद्धा सत्ताधाºयांमध्ये रूसवे-फुगवे होत असल्याचे बोलले जाते. त्यांच्या आपसातील भांडणात नागरिकांमध्ये चुकीचा संदेश पोहोचत असून, निदान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तरी सत्ताधाºयांमधील अंतर्गत लाथाळ्यांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.