सर्व ५९५ ग्रामपंचायतींचे जैवविविधता रजिस्टर पर्यावरण विभागाकडे ‘सबमिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:01 IST2020-02-08T13:01:20+5:302020-02-08T13:01:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामीण भागातील जैवविविधता संवर्धनाठी केंद्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार जैवविविधता रजिस्टर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात ...

'Biodiversity Register' of all 499 Gram Panchayats submitted to Environment Department | सर्व ५९५ ग्रामपंचायतींचे जैवविविधता रजिस्टर पर्यावरण विभागाकडे ‘सबमिट’

सर्व ५९५ ग्रामपंचायतींचे जैवविविधता रजिस्टर पर्यावरण विभागाकडे ‘सबमिट’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ग्रामीण भागातील जैवविविधता संवर्धनाठी केंद्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार जैवविविधता रजिस्टर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते़ यानुसार जिल्ह्यत सुरु असलेले कामकाज पूर्ण पूर्ण झाले असून सर्व ५९५ ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे ३१ जानेवारीपूर्वी रजिस्टर सबमिट केले आहे़
जिल्हा परिषदेकडे देण्यात आलेले सर्व जैवविविधता रजिस्टर पुणे येथील पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आल्या असून वही तयार करण्याचा पहिला टप्पा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची निर्धारित वेळेत पूर्ण केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे़ येत्या आठ महिन्यात नोंदवहीची पडताळणी करुन पर्यावरण विभाग पुढील दिशानिर्देश देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ या रजिस्टर अंतर्गत जिल्ह्यातील जमीन, माती, पाणी, हवामानाधारित पिके, वनक्षेत्र, वन्यजीव, पाळीव जीव यासह पक्षी, फुले आदींची माहिती संकलित करुन देण्यात आली आहे़ ग्रामसेवक आणि ग्रामस्तरावर निर्माण करण्यात आलेल्या समित्यांनी या कामकाजात ३१ प्रश्नांची माहिती भरुन देत रजिस्टर तयार केले होते़ रजिस्टरमुळे अनेक कालबाह्य झालेल्या जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मदत मिळणार आहे़ सातपुड्याच्या दुर्गम भागातील अन्न धान्य आणि पाळीव पशुंच्या प्रजातींचे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर डॉक्यूमेंटेशन झाल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आले आहे़ पर्यावरण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यात सर्व रजिस्टर तपास नामशेष होऊ पाहणाºया वनस्पती, पिके यासह विविध माहितीचे संकलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ त्यांच्या संवर्धनासाठी तिसºया टप्प्यात योजना अंमलात आणण्याची तर चौथ्या टप्प्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
राज्यातील सर्व जिल्ह्यांनी ह्या रजिस्टरचे काम वेळेत पूर्ण केल्याचे सांगण्यात आले आहे़ जिल्ह्यातील कृषी, सामाजिक वनीकरण, वनविभाग यासह विविध विभागांनी हे रजिस्टर तयार करण्यासाठी ग्रामसेवक आणि ग्रामस्तरीय समिती यांना सहाय्य केले होते़

Web Title: 'Biodiversity Register' of all 499 Gram Panchayats submitted to Environment Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.