संडे स्पेशल मुलाखत- सप्तरंग फाऊंडेशनची संकल्पना देशकार्यासाठी भूमिपूत्रांचा अभिनव उपक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:21 PM2020-10-18T12:21:10+5:302020-10-18T12:22:06+5:30

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय जवानांचा त्याग आणि बलिदानाचा सर्वांनाच अभिमान आहे. त्याची जाणीव ठेऊन ...

Bhumiputra's innovative venture for national work! | संडे स्पेशल मुलाखत- सप्तरंग फाऊंडेशनची संकल्पना देशकार्यासाठी भूमिपूत्रांचा अभिनव उपक्रम!

संडे स्पेशल मुलाखत- सप्तरंग फाऊंडेशनची संकल्पना देशकार्यासाठी भूमिपूत्रांचा अभिनव उपक्रम!

Next

रमाकांत पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय जवानांचा त्याग आणि बलिदानाचा सर्वांनाच अभिमान आहे. त्याची जाणीव ठेऊन त्यांना मदतीसाठी समाजातूनही खारीचा वाटा उचलता यावा यासाठी सप्तरंग फाऊंडेशनने समविचारी कार्यकर्ते जोडून दरमहा नॅशनल डिफेन्स फंड व आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड या खात्यामध्ये प्रत्येकी दहा रुपये दर महिन्याला जमा करण्याचा सुरू केलेल्या उपक्रमाला अल्प काळातच प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही चळवळ शहादा परिसरात अधीक गतीमान झाल्याची प्रतिक्रीया सप्तरंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.वसंत अशोक पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना व्यक्त केली.

ही चळवळ सुरू करण्याची संकल्पना कशी आली?
आम्ही काही मित्र नेहमी एकत्र बसून विचारांची देवानघेवान करीत असतो. त्यातूनच समाजाचे आपण काही लागतो त्याचे ऋण फेडावे या भुमिकेतून भारतीय सैनिक निधीला मदत करण्याची चर्चा सुरू झाली. त्यातूनच केवळ सैनिक कल्याण निधीच नव्हे तर संरक्षण खात्यासाठीही मदत करता यावी व लोकांमध्ये त्यातून देशभावना जागृत व्हावी या उद्देशाने ही संकल्पना सुचली. प्रत्येकाला झेपेल असे आपल्या उत्पन्नातून केवळ दहा रुपये या दोन्ही खात्यात दर महिन्याला जमा करण्याचे ठरले. त्याचा व्हॉट्‌स गृप बनविला आणि चर्चेचर्चेत गृपमध्ये अनेक लोक सहभागी झाले. चार महिन्यापासून हा उपक्रम सुरू झाला आहे.
मदत कशी पाठविली जाते?
आर्मी सेंट्रल वेल्फेअर व नॅशनल डिफेन्स फंड या दोन्ही खात्याचे बँक अकाऊंड नंबर गृपमध्ये जुळलेल्या व्यक्तीला दिला जातो. ते डिजीटल पेमेंटने त्या खात्यात दर महिन्याला रक्कम पाठवितात व त्याची माहिती व्हॉट्‌सअपवर ते गृपवर कळवतात.

वंदे मातरम नावाने सुरू झालेल्या या गृपला आतापर्यंत जवळपास ४०० लोकं जुळले गेले आहेत. संख्या वाढल्याने दोन गृप केले आहेत. अजूनही लोक जुळत आहेत. हे लोक दर महिन्याला न चुकता दोन्ही खात्यात प्रत्येकी दहा रुपये भरताहेत. रक्कम थोडी असली तरी त्यातून देशभक्तीची भावना दृढ होत असल्याचा आनंद आहे.

डिजीटल साक्षरताही वाढली 
गृपमध्ये सहभागी बहुतांश लोक शेतकरी असून जवळपास ९० टक्के लोकांनी यापूर्वी कधी डिजीटल पेमेंट केले नव्हते. त्या लोकांना तसे प्रशिक्षण देण्यात आल्याने लोकांमध्ये डिजीटल साक्षरता देखील वाढत आहे. त्यामुळे या संकल्पनेत ती भर पडली. सप्तरंग फाऊंडेशनचे डॅा.वसंत पाटील अध्यक्ष असून मुकेश प्रल्हाद पाटील, अनिल सुभाष पाटील, किशोर जयदेव पाटील, ईश्वर रामदास पाटील, आनंद बन्सीलाल पाटील, शांतीलाल पुरुषोत्तम पाटील हे सदस्य आहेत. 

वंदेमातरम हा व्हॅाट्‌सअपवरील सुरू केलेल्या गृपला पहाता पहाता अनेकजण देशभक्तीच्या विचाराने जोडले गेेले आणि त्यातूनच हा अभिनव उपक्रम सुरू झाला.
-डॅा.वसंत पाटील, अध्यक्ष, सप्तरंग फाऊंडेशन, शहादा

 

Web Title: Bhumiputra's innovative venture for national work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.