शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील सराफा व्यावसायिकांचे सोने घेवून बंगाली कारागिर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा  : शहरातील सराफा व्यावसायिकांकडून दागिने बनविण्यासाठी देण्यात आलेले सोने घेऊन बंगाली कारागीर फरार  झाला असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा  : शहरातील सराफा व्यावसायिकांकडून दागिने बनविण्यासाठी देण्यात आलेले सोने घेऊन बंगाली कारागीर फरार  झाला असून जवळपास अर्धा ते एक किलो सोने लंपास करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशीरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.पोलीस सूत्रांनुसार, बंगाली कारागिरांकडून शहर व ग्रामिण भागातील सराफा व्यापारी व सोने-चांदीचे दागिने विक्री करणारे सोन्याचे आभूषणे व दागिने बनवून घेतात. हा व्यवहार ब:याच वर्षापासून सुरू आहे. असेच दागिने बनविण्यासाठी एका बंगाली कारागिराकडे सराफा व्यापा:यांनी सोने देत होते. सोने दिल्यानंतर मागणीप्रमाणे हा कारागीर दागिने देण्यासाठी येत असे. मात्र सोमवारी हा कारागीर 12 वाजेर्पयत संबंधित व्यावसायिकांना दागिने देण्यासाठी आला नाही. हा प्रकार ज्या व्यापा:यांनी या कारागिराकडे सोने दिले होते त्यांनी एकमेकांकडे चौकशी केल्यानंतर लक्षात आला. त्यानंतर व्यावसायिकांनी त्याचे दुकान व घरी तपास केला असता तो परिवारासह गायब झाल्याचे निदर्शनास आले. कोणत्या व्यावसायिकाचे किती सोने होते याची जुळवाजुळव सुरू असून सराफा व्यावसायिकांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घटना सांगितली. नंदुरबार येथून एलसीबीच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनीही लागलीच तपासाला सुरुवात केली. रात्री उशीरार्पयत पोलीस स्टेशनला घटेनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.दरम्यान, या कारागिराकडे कोणत्या व्यापा:याने किती सोने दिले होते याची जुळवाजुळव झाल्यावरच किती सोने घेऊन हा कारागीर गायब झाला हे समजणार आहे. मात्र शहर व परिसरात दिवसभर याच घटनेची चर्चा सुरू होती.