सातपुडय़ात नैसर्गिक मासेमारीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 02:20 PM2019-11-17T14:20:18+5:302019-11-17T14:20:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ात दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होणारा नैसर्गिक मासेमारी उद्योग यंदा पावसामुळे उश्रिा सुरु झाला. उशिर ...

Beginning of natural fishing in Satpudya | सातपुडय़ात नैसर्गिक मासेमारीला सुरूवात

सातपुडय़ात नैसर्गिक मासेमारीला सुरूवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ात दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होणारा नैसर्गिक मासेमारी उद्योग यंदा पावसामुळे उश्रिा सुरु झाला. उशिर होऊनही अपेक्षेनुसार मासे पिंज:यात अडकत नसल्यामुळे मासेमारी करणा:या बांधवांचा नदीवरील रात्रीचा मुक्काम फारसा फलदायी ठरत नाही. 
मासेमारीच्या असंख्य तथा विकसीत पद्धती असल्या तरी सातपुडय़ातील आदिवासी बांधवांमध्ये आजही नैसर्गिक पद्धतीने मासेमारी करण्यात येत आहे. ही पद्धत प्रामुख्याने विंध्य व सातपुडा या दोन्ही पर्वतामध्ये शिवाय नर्मदा व तापी नदीच्या  खो:यात दिसून येते. दोन्ही पर्वताच्या रांगेलीत मासे हे एरवी लहान अकाराचेच असले तरी ते आरोग्याला पोषक व आहारात चवदार आहे. त्यामुळे या मास्यांना दुरवर मागणी असते. यातून मासेमारी करणा:यांना अपेक्षेनुसार उत्पन्न मिळत असल्यामुळे हा उद्योग त्यांच्यासाठी शेतीपुरकच ठरत आहे. पोषक, चवदार असूनही वाजवी किमती आकारल्या जात असल्यामुळे ग्राहकांमधून कुठलीही नाराजी व्यक्त केली जात नाही. हे मासे वर्ष दोन वर्ष साठवून ठेवले तरी त्यातील पोषक तसूभरही कमी होत नाही. 
रात्रीच्या वेळेस मासळी नेहमीच पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चालत असते. त्यामुळे  ही बाब सातपुडय़ातील आदिवासी बांधवांनी चांगली प्रामुख्याने दोन पद्धतीने मासेमारी  करीत आहे. एका पद्धतीत पाण्याच्या संपूर्ण वळवून एकाच ठिकाणी धबधब्याचे स्वरुप दिले जाते, त्याला तेथील भाषेत रोबो म्हटले जाते यासाठी हे बांधव सागाची पाने व नदीतीलच दगडगोटय़ांचा वापर  करीत मोठे कष्ट करतात. एकाच ठिकाणी पडणा:या धबधब्याखाली बांबूपासून निर्मित पिंजरा मांडला जातो, या पिंज:याला तेथील भाषेत बोअनं असे म्हटले जात आहे. पिंज:यात रात्रभरात कमी अधिक प्रमाणात चार किलोर्पयत मासे पडत असतात. 
मासेमारीच्या दुस:या पद्धतीतही पाण्याच्या प्रवाह एकवटून वरील विस्ताराने मोठा धबधबाच निर्माण केला जातो. परंतु मासे हे प्रवाहाच्या विरुद्ध जात असल्यामुळे धबधब्याच्या आजूबाजूला उतरत्या बाजूने तोंड करुन वेगळ्या प्रकारची पिंजरे लावली जातात. धबधबा निर्माण केला जात असल्यामुळे त्या धबधब्यात मासे प्रवाहाविरुद्ध जाऊ शकत नाही. त्यामुळे मासे धबधब्याच्या दोन्ही बाजूला निर्माण केलेल्या लहान प्रवाहाच्या जागेतून जातात. त्याच ठिकाणी ही पिंजरे खालच्या बाजूने तोंड करुन लावली जात असल्यामुळे मासे पिंज:यात अडकतात. या पिंज:याला मुळ्यं असे नाव दिले गेले आहे. पिंज:यात अडकेलली मासे परत निघू नये, यासाठी विशिष्ट पद्धतीने मुळ्यं बनविले जात असल्यामुळे मास्यांना पुन्हा त्यातून निघता येत नाही. 
आजच्या स्थितीत कुंडल येथे दादी जात्र्या वळवी, माकत्या वेस्ता पाडवी, दिलीप मोल्या वळवी, तुकाराम रुबजी पाडवी, रतिलाल मोल्या वळवी, किसन पाडवी, दिलीप काडा पाडवी यांच्यासह अनेक जण मासेमारी करीत आहे. 


दुर्गम भागात सातत्याने पाऊस होत राहिल्यामुळे मासेमारीसाठी सातपुडय़ातील बांधवांना अपेक्षेनुसार सवळ मिळाली नाही. दरवर्षी सप्टेंबरमध्ये ही मासेमारी सुरु होते. यंदा मात्र महिनाभर लांबल्यामुळे यातून अपेक्षेनुसार उत्पन्न मिळू शकले नाही. त्यातच नदीतील पाण्याचा प्रवाह कमी- अधिक होत राहिल्यामुळे पिंज:यात मासे अडकत नाही. आज सकाळी काढलेल्या पिंज:यातून नदीत राहणारे चारर बिनविषारी सापांनी पिंज:यात प्रवेश केला होता. त्यांनीच पिंज:यातील निम्मेपेक्षा अधिक मास्यांना भक्ष केल्याचे कागडा पाडवी यांनी सांगितले.
 

Web Title: Beginning of natural fishing in Satpudya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.