शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिवीरच्या टंचाईला राजकारणाचा आधार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST

जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली, त्यावेळी लॉकडाऊनमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. आधीच आजाराबाबतची वेगळी भीती आणि त्यातच गोरगरीब ...

जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली, त्यावेळी लॉकडाऊनमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. आधीच आजाराबाबतची वेगळी भीती आणि त्यातच गोरगरीब मजूर व स्थलांतरितांचे, झोपडपट्टीतील लोकांचे खूपच हाल झाले. अशा वेळी सर्वच क्षेत्रातील सेवाभावी लोक माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी पुढे आले होते. त्या माणुसकीच्या वातावरणात कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील काळ जिल्हावासीयांसाठी निश्चितच फारसा वेदनादायी ठरला नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यात अर्थातच या वर्षी मार्चनंतर परिस्थिती खरोखरच हाताबाहेर जात असल्याचीच स्थिती आहे. आजही अनेकांना मदतीची प्रतीक्षा आहे, पण या मदतीसाठी गेल्या वर्षासारखे हात दिसून येत नाहीत. खास करून रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांवर योग्य उपचारासाठी पुरेशी व्यवस्था झाली नाही. जिल्ह्यात मोठे उद्योगपती अथवा मोठ्या संस्था नसल्याने, मेट्रो सिटीत जसे सेवाभावी तात्पुरते कोरोना हॉस्पिटल सुरू झाले, तसे येथे सुरू झाले नाही. आहे त्या व्यवस्थेतच यंत्रणाही अपुरी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा अथवा सामाजिक पाठबळ आहे, असे रुग्ण जिल्ह्याबाहेरील मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत, परंतु ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना स्थानिक स्तरावरच माफक दरात उपचाराच्या सुविधा शोधाव्या लागत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे ठरत आहे, ते म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शन. हे इंजेक्शन खासगी मेडिकलवर मिळणे दुरापास्त झाले आहे. आहे त्या ठिकाणीही दर अव्वाच्या सव्वा असल्याने सर्वसामान्यांची आस तेथेच तुटते. इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. काहींचे या इंजेक्शनअभावी मृत्यू झाल्याच्याही नातेवाइकांच्या तक्रारी आहेत. अशा स्थितीत या इंजेक्शनचे महत्त्व जाणून सर्वप्रथम माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुढाकार घेऊन गेल्या काही महिन्यांपासून सवलतीच्या दरात या इंजेक्शनची सुविधा सुरू केली होती. या महिन्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता, हिरा प्रतिष्ठानचे संस्थापक हिरालाल चौधरी यांनी सवलतीच्या दरात या इंजेक्शनची सेवा सुरू केली आहे. हीच प्रेरणा घेऊन शहादा येथेही सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सवलतीच्या दरात इंजेक्शन सेवा सुरू केली आहे. एकूणच या सेवेसाठी पुढे आलेली ही मंडळी निश्चितच राजकारणातील आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी या सेवेला निश्चितच राजकीय झालर दिसून येत असली, तरी वास्तवात मात्र ही सेवा अनेकांची आयुष्यवर्धिनी ठरत आहे. त्यामुळे या सेवेचे निश्चितच कौतुक केले पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता, रुग्णांची अवस्था गंभीर होत असल्याने या सेवेची व्यापकता अजून वाढण्याची आवश्यकता आहे.