शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ात ‘गंगम्मा’ परसबागा ठरणार आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील दुर्गम भागात घरोघरी लहानथोरांच्या पोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘गंगम्मा’ परसबागा आधार ठरणार आहेत़ काकर्दा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील दुर्गम भागात घरोघरी लहानथोरांच्या पोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘गंगम्मा’ परसबागा आधार ठरणार आहेत़ काकर्दा ता़ धडगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या सहाकार्याने 200 महिला ग्रामस्थांनी परसबागांची निर्मिती केली आह़े     काकर्दा परिसरातील गावांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अंशत: वाढलेले असल्याने त्याठिकाणी ताजा भाजीपाला पोषणात मिळावा या उद्देशाने कमी जागेत अधिक भाजीपाला उत्पादन देणा:या गंगम्मा मॉडेल परसबागांची निर्मिती करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कोळदा व उमेद या संस्थांनी पुढाकार घेतला होता़ यानुसार काकरदा परिसरात परस बागांची निर्मिती केली गेली आह़े या परसबागांची अधिक माहिती मिळावी यासाठी काकरदा येथे महिलांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण  शिबिर घेण्यात आल़े यावेळी  परसबागांची निगा कशी राखली जावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आल़े गंगम्मा भाजीपाला परसबागेत तब्बल 15 प्रकारचा भाजीपाला पिकवण्याचे तंत्र महिलांना यापूर्वी समजावण्यात आले होत़े काकरदा परिसरात गेल्या काही वर्षात फळ झाडांची लागवड करण्यात आल्याने युवकांना रोजगार मिळाला आह़े त्यातुलनेत आता महिलांनाही भाजीपाला उत्पादनाची संधी मिळून दुर्गम भागातील कुपोषण दूर करण्यासाठी सहाय्यकारी उपक्रम राबवण्याची संकल्पना परिसरातील ग्रामस्थांनी कृषी विज्ञान केंद्राकडे मांडली होती़ त्यानुसार परिसरातील शेतशिवार आणि घरांच्या मागील बाजूस गोलाकार परबागांचे कुंपण नरजेस पडत आह़े सप्टेंबरमध्ये त्यातून उत्पादन येणार आह़े काकरदा परिसरातील शेतक:यांनी काही महिन्यांपूर्वी प्रात्यक्षिक स्वरुपात परस बागेची उभारणी करुन उत्पादनाची चाचपणी करुन घेतली होती़ याठिकाणी परसबाग लागवड व्यवस्थापनाबाबत कृषी विज्ञान केंद्रांच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले होत़े कीटकनाशक आणि रासायनिक खते यांचा कमीत कमी वापर करुन उत्पादन घेण्यावर महिलांनी भर दिला होता़ प्रात्यक्षिक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली़ तूर्तास 200 महिला परसबागांमध्ये दिवसातून चार तासांपेक्षा अधिक काळ वेळ देत आहेत़ परसबागांची चळवळ वाढावी यासाठी  440 शेतकरी महिंलांनी परसबाग करण्याचे नियोजन केले आह़े यातील 200 परसबागा ह्या गगमा मॉडेलमध्ये उभारण्यात आले आह़े परसबागेत पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्यांची लागवड करण्यात आली आह़े यात प्रामुख्याने पालक, पोकळा, मेथी, कोथींबीर, वेलवर्गीय कारले, गिलके ,दोडके, दुधीभोपळा, काकडी तसेच गावर, चवळी, भेंडी, टमाटे, वांगे, मिरची या रोपांची लागवड करण्यात आली आह़े याठिकाणी शेवगा आणि कडीपत्ताच्या रोपांची लागवड करण्यात आली आह़े या उत्पादनांना आहारात कसे समाविष्ट करावे याचेही प्रशिक्षण दिले जात आह़े