शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

बालिका दिनानिमित्त जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय बालिका दिन सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ‘बेटी बचाओ, बेटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय बालिका दिन सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी शपथ घेतली.यावेळी पालकमंत्री म्हणाले, आदिवासी भागात मुलगा आणि मुलगी असा भेद केल जात नाही. या समाजात महिलांचा सन्मान केला जातो. मुलींच्या जन्माचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी नंदुरबार आदिवासी समाजाचा आदर्श इतरांनी घ्यावा. मात्र त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला महत्व देण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. सकाळी नेहरु पुतळा, गांधी पुतळा, जुनी नगरपालिका मार्गे प्रभातफेरीचा नेहरु पुतळ्याजवळ समारोप झाला. प्रभातफेरी दरम्यान पथनाट्याद्वारे मुलींना शिक्षण देण्याचा व भ्रृणहत्या रोखण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी आमदार राजेश पाडवी, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राम रघुवंशी, विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव सतीश मलिये, महिला बालविकासचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बापूराव भवाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद वळवी, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, तालुका वैद्यकीय अधिकारी जे. आर. तडवी, डॉ. राजेश वळवी आदी उपस्थित होते. पाडवी यांनी यावेळी गावागावात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचे आवाहन केले.रॅलीत अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.