शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तळाेद्यातील जागृत देवस्थान रोकडमल हनुमान मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

तळोदा : शहरातील रोकडमल हनुमान मंदिर साधारण १५० वर्षांपूर्वीचे प्राचीन असून एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे ...

तळोदा : शहरातील रोकडमल हनुमान मंदिर साधारण १५० वर्षांपूर्वीचे प्राचीन असून एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे नवसाला पावणारा हा मारुती असल्याने येथे दर शनिवारी भाविक भंडारा देतात असे असले तरी हे देवस्थान विकासापासून उपेक्षितच राहिले आहे. निदान तेथील पक्का रस्ता व इतर सुविधा तरी उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी आहे.

तळोदा शहरात गावातील हनुमान मंदिर,हतोड्या रस्त्यावर गोऱ्या हनुमान ,मराठा चौकातील लष्करी हनुमान, दलेलपूर रस्त्यावरील रोकडमल हनुमान अशी चार मंदिरे आहेत.तथापि शहारापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रोकडमल हनुमान मंदिर खूप प्राचीन आहे. १८८२ पूर्वीचे आहे.एक जागृत देवस्थान म्हणून ते सर्वत्र ओळखले जात असते. ते दक्षिण मुखी आहे. सदर मंदिर एका शेतात वसले आहे. १८८४ ला जेव्हा प्लेगची दुसरी लाट आली होती, तेव्हा सर्व तलोडेकर गाव सोडून गावाच्या शिवेलगत असलेल्या या मंदिर परिसरात तब्बल दीड,दोन महिने राहिले असल्याचे जुने जाणकार लोक सांगतात. याशिवाय विजयादशमीला सीमोल्लंघन करण्यासाठी शहरवासी येथे येत असल्याची परंपरा आहे. रोकदमल मारुती संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याबरोबर गुजरातमधील सीमावर्ती भागात एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जात असल्यामुळे भाविक आपला नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. साहजिकच यामुळे दर शनिवारी कोणीना कोणी भक्त भंडारा देत असतो. भाविक देखील प्रसादासाठी जातीने हजेरी लावतात. पूर्वी केवळ लहानसा डरा असलेल्या या मंदिरास भक्तांच्या आर्थिक मदतीतून टुमदार मंदिर बनले आहे.विशेष म्हणजे सदर मंदिरात कुठलेही ट्रस्ट नाही. केवळ भक्तांच्या आर्थिक मदतीतून देखभाल,दुरुस्तीच्या खर्च चालत असतो.

विकासापासून उपेक्षितच

तालुक्यात प्रसिद्ध असलेलं हे जागृत देवस्थान विकासापासून उपेक्षितच राहिले आहे. दर शनिवारी भाविकांच्या मोठा राबता असतो.अंकलेश्वर, बऱ्हाणपूर महामार्गाच्या वळण रस्त्यावरून जवळच असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधा रस्ता नाही. जो आहे तो ही अतिशय अरुंद आहे. साधी दोन लहान चार चाकी एकमेकांसमोरून जाताना अक्षरशः कसरत करत काढावे लागत असते. रस्ता कच्चा असल्यामुळे भाविकांना पावसाळ्यात चिखल तुडवत मंदिरात दर्शनासाठी जावे लागत असल्याची भाविकांची व्यथा आहे.वास्तविक शासनाच्या गॅझेटमध्ये या मंदिराचा समावेश करण्यात आला असल्याचे म्हटले जाते. तरीही अजून विकासापासून वंचित आहे. निदान लोकप्रतिनिधींनी तरी सदर जागृत देवस्थानच्या विकासाबाबत ठोस प्रयत्न करण्याची मागणी आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी देखील निवडणुकीतील आपल्या प्रचाराच्या शुभारंभ मंदिराचे दर्शन घेऊनच करीत असतात.

१९५३ साला पूर्वी या हनुमान मंदिर परिसरात पाण्याची टंचाई होती. त्यामुळे शहरातील भाविक हनुमान जयंतीच्या आधी पाच ते दहा घागरी कावड पाणी नेऊन मंदिराची साफ सफाई करीत असत. त्यानंतर हनुमानाला शेंदुरचे लेपन लावत असत. शिवाय जंगलातून बांबू आणून जयंतीच्या दिवशी त्याला ध्वज चढवून पूजा अर्चा केली जात होती. हनुमान जयंती व विजयादशमीच्या दिवशी हा ध्वज बदलला जात होता.त्यानंतर काळाच्या ओघात ही परंपरा बंद पडली.