शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-अहमदाबाद बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : अक्कलकुवामार्गे अहमदाबादकडे जाणारी औरंगाबाद-अहमदाबाद या बसचा शनिवार कुकरमुंडा फाटय़ाजवळ अपघात झाला. या वेळी समोरून ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अक्कलकुवामार्गे अहमदाबादकडे जाणारी औरंगाबाद-अहमदाबाद या बसचा शनिवार कुकरमुंडा फाटय़ाजवळ अपघात झाला. या वेळी समोरून येणा:या वाहनाच्या तीव्र प्रकाश व खड्डय़ामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ही बस रस्त्यावरुन खाली उतरली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.याबाबत असे की, अक्कलकुवामार्गे अहमदाबादकडे जाणारी बस क्रमांक एमएच 20, बीएल 4060 ही पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास तळोद्याहून अक्कलकुवामार्गे अहमदाबादकडे मार्गस्थ झाली. ही बस तळोदा ते अक्कलकुव्या दरम्यान असणा:या कुकरमुंडा फाटय़ाजवळ आली असता समोरून येणा:या वाहनांच्या लाईटच्या तीव्र प्रकाशामुळे बस चालकाला रत्यावरील मोठमोठे खड्डे पाहण्यास त्रास झाला. त्यामुळे बस खड्डय़ात गेल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्यावरून उतरून शेजारील चारीत गेल्याने अपघात घडला. हा अपघात पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडल्यामुळे बसमध्ये 14 प्रवाशी होते. त्यापैकी कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याची       माहिती बसचे वाहक डी.के. दिळवणे व चालक युवराज चव्हाण यांनी  दिली.बसचा वेग कमी असल्याने व झाडांमुळे बस  चारीतील खोल भागात उतरली नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अपघाताची माहिती मिळताच अक्कलकुवा आगाराचे वाहतूक निरीक्षक सचिन पाटील, वाहन परिक्षक डी.के. चित्ते, वाहतूक नियंत्रक के.एस. वसावे हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी अपघातग्रस्त बसचा पंचनामा केला.दरम्यान नेत्रंग ते शेवाडी राष्ट्रीय महामार्गावरील तळोद्यापासून गुजरातकडे जाणा:या रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाली असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्डय़ांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, वाहनधारकांना खड्डे टाळता टाळता नाकी नऊ येत आहे. या मार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून, या मार्गावरील खड्डे मातीने बुजविण्यात आली असल्याने मोठय़ा प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरते. रात्रीच्या वेळी तर या मार्गावरील वाहतूक धोकेदायक ठरत आहे.