शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्था कार्यालयात चोरीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील ब्राम्हणवाडी परिसरातील एका पतसंस्थेचे कार्यालय मध्यरात्री चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु या भागातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील ब्राम्हणवाडी परिसरातील एका पतसंस्थेचे कार्यालय मध्यरात्री चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु या भागातील नागरिकांच्या सजगतेमुळे चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान, गणपती मंदीर परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. याबाबत बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती.नंदुरबारातील ब्राम्हणवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. पतसंस्थेच्या दरवाजाजवळ जोराने ठोकण्याचा आवाज येत असल्यामुळे या परिसरात राहणारे रमेश व मनोज जैन यांनी घराबाहेर येवून कानोसा घेतला. त्यांना दोन ते तीनजण दरवाजा तोडतांना दिसले. त्यांनी लागलीच आरडाओरड केली असता तेथून दोन ते तीनजण पसार झाले. नगरसेवक चारूदत्त कळवणकर यांना परिसरातील नागरिकांनी माहिती दिल्यावर त्यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधला. निरिक्षक अरविंद पाटील यांनी लागलीच पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसर पिंजून काढला, मात्र उपयोग झाला नाही. सकाळी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी धुंडाळून काढले असता गणपती मंदीर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तीन चोरटे पळतांना दिसून आले. तिन्हीजण युवक असून त्यांनी मंगळबाजाराकडे धूम ठोकल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. त्यांच्या पेहराव आणि शरिरयष्टीवरून पोलिसांनी त्यांचा माग काढण्यास सुुरुवात केली आहे.दरम्यान, पतसंस्थेचे व्यवस्थापक विनोद जैन यांनी सांगितले, कार्यालयात रोख रक्कम नव्हती. दैनंदिन ठेव व इतर रक्कम वेळीच बँक खात्यात जमा केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पतंस्थेच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा चोरट्यांनी तोडलेला होता. जैन बंधूंना जाग आली नसती तर चोरट्यांनी परिसरातील इतर घरांकडेही मोर्चा वळविला असता असे बोलले जात आहे.याबाबत सायंकाळी उशीरापर्यंत या घटनेसंदर्भात पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती.दरम्यान, भर वस्तीत चोरट्यांनी घातलेल्या धुमाकूळमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा व नियमित गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.