शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतून कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे शिक्षण देणार - के. सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तळोदा तालुक्यातील राणीपूर येथील माध्यमिक आश्रमशाळा नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ...

आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तळोदा तालुक्यातील राणीपूर येथील माध्यमिक आश्रमशाळा नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, माजी मंत्री पद्माकर वळवी, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी अविशांत पंडा, तहसीलदार गिरीश वखारे, सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर व जानगर, एस. एम. चौधरी, सुवर्णा सोळंकी, विस्तार अधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

ॲड. पाडवी म्हणाले, शैक्षणिक विकासाबरोबर समाजाचा विकासही महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे ‍शिक्षण देणे आवश्यक आहे. आदिवासी विभागातर्फे आश्रमशाळेसाठी ५५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना चांगला गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येत आहे. पालकांनी आश्रमशाळेतील सुविधांचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, यासाठी मुलांना अधिकाधिक शिक्षण घेऊ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. मागच्या पिढीने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. त्या तुलनेत आज चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा उपयोग करून शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाचे ध्येय गाठावे.

अडीच ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आश्रमशाळेत नर्सरीची सुविधा आणि पहिली ते पाचवीतील शिक्षण इंग्रजीतून देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. राणीपूर येथे मुलांच्या वसतिगृहालाही मंजुरी देण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. नकट्यादेव ते गोऱ्यामाळ या १३ कोटी खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ॲड. सीमा वळवी म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन बदलत्या काळानुसार नवे तंत्र आत्मसात करावे. नव्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. यातून गुणवत्तावाढीला चालना मिळेल. शिक्षकांनी नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करावे.

आमदार पाडवी म्हणाले, आश्रमशाळेमुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. संगणकीय सुविधेचा लाभ घेऊन चांगले अधिकारी घडतील. पालकांनी आपली मुले शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. भारुड म्हणाले, ९ कोटी खर्च करून ही सुसज्ज इमारत तयार करण्यात आली आहे. आश्रमशाळेच्या माध्यमातून चांगले इंजिनीअर, डॉक्टर आणि अधिकारी घडावे, असे प्रयत्न आहेत. विद्यार्थ्यांनी चिकाटीने प्रगतीचा ध्यास करावा व मिळालेल्या संधीचे सोने करावे.

माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी स्पर्धेच्या युगात टिकणारा विद्यार्थी घडविण्यासाठी आश्रमशाळेतील सुविधा उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविकात पंडा म्हणाले, तळोदा प्रकल्पांतर्गत आठ आश्रमशाळा इमारतींना मंजुरी मिळाली असून, आणखी पाच इमारतींना मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. राणीपूर आश्रमशाळेत प्रयोगशाळेसह ११ वर्गखोल्या, संगणक कक्ष आणि मुलींचे वसतिगृह आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांना लाभ होईल.

[25/01, 14:37] श्ं२ंल्ल३ टं१ं३ँी छङ्म‘ें३ ळं’ङ्मंि: तळोदा, राज्यातील शासकीय आश्रमशाळांच्या विकासासाठी राज्य शासनाने आदिवासी विकास विभागातून साधारण ५५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिली.