बनावट पीयूसी सेंटर चालविणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 12:37 IST2020-10-20T12:37:30+5:302020-10-20T12:37:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बनावट पीयूसी प्रमाणपत्र तयार करून ते वितरीत करून आरटीओची फसवणूक केल्याप्रकरणी नटवाडा, ता.शिरपूर येथील ...

बनावट पीयूसी सेंटर चालविणाऱ्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बनावट पीयूसी प्रमाणपत्र तयार करून ते वितरीत करून आरटीओची फसवणूक केल्याप्रकरणी नटवाडा, ता.शिरपूर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
पोलीस सूत्रांनुसार, नटवाडा येथील दिलीप वासू पावरा याने साईप्रसाद पीयूसी सेंटर नावाने बोगस पीयूसी सेंटर चालवीत होता. त्या माध्यमातून तो बनावट पीयूसी प्रमाणपत्रही वितरीत करीत होता. ही बाब नंदुरबार आरटीअी विभागाला कळाली. त्यांनी काही वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता ते बोगस आढळले. त्या आधारे तपास करून दिलीप पावरा याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
याबाबत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम लक्ष्मण जाधव यांनी फिर्याद दिल्याने दिलीप पावरा याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. सहाक पोलीस निरिक्षक दिवटे तपास करीत आहे.