शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात ४ पथकांची नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी शाहुराज ...

अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी शाहुराज मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, शिक्षणाधिकारी राहुल चौधरी, तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजेश शिंटे आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, लसीकरणासाठी प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी, २ परिचारिका आणि दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. शिक्षकांनी जनतेच्या मनातील शंकांचे निरसन करून, त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. दोन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण तालुक्यातील पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण होईल, यानुसार नियोजन करावे.

येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील ‍व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून पात्र व्यक्तींची नोंदणी करण्याचे काम केंद्र प्रमुखांनी सुरू करावे. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदी गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांचे यासाठी सहकार्य घेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

गावडे म्हणाले, सर्व यंत्रणांनी एकत्रिपणे गावतपाळीवरील नियेाजन करावे. परस्पर समन्वय साधून अधिकाधिक प्रमाणात लसीकरण होईल, या दृष्टीने प्रयत्न करावे. लसीकरणाबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यात यावी.

बैठकीस अक्कलकुवा तालुक्यातील सर्व खातेप्रमुख, नायब तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, आरोग्य विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

अक्कलकुवा कोविड केअर सेंटरला भेट

जिल्हाधिकाऱ्यांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. या रुग्णालयात १५ खाटांची व्यवस्था असून, त्यापैकी ६ ऑक्सिजन सुविधा असणाऱ्या खाटा आहेत. रुग्णालय परिसरातील लसीकरण केंद्र, खापर येथील कोविड केअर सेंटर आणि आरोग्यवर्धिनी केंद्रालाही डॉ.भारुड यांनी भेट दिली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून जामिया रुग्णालयाचे कौतुक

अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांना कोविड काळात चांगली सेवा देणाऱ्या जामिया रुग्णालयाचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कौतुक केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी या रुग्णालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड कक्षाला भेट दिली. जामिया इन्स्टिट्यूटतर्फे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयात ८ ऑक्सिज खाटा, २१ इतर खाटांसह सर्व प्रकारच्या रक्तचाचण्या आणि डिजिटल एक्स-रेची सुविधा आहे. दुर्गम भागातील जनतेसाठी रुग्णालयतर्फे अल्पदरात दिली जाणारी सेवा महत्त्वाची आहे. सेवाभावी वृत्तीने शुल्कात सवलतही दिली जात असल्याने, गरीब आणि गरजू रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. रुग्णालयात कोविड खाटांची संख्या वाढवावी, अशी सूचना त्यांनी केली.

इन्स्टिट्यूटमधील रुग्णालाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू रुग्णांवर उपचारांना प्राधान्य देण्यात येत असून, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार, खाटांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे जामिया इन्स्टिट्यूटचे मौलवी हुजेफा वस्तानवी यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तहसीलदार रामजी राठोड आदी उपस्थित होते.

-----