शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू; तापाने फणफणत असताना आणि हाताला सलाईन असतानाही गायत्री गावितांची अशीही रुग्णांची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू...’ प्रसिद्ध गीतकार आणि लेखक ग.दी. माडगूळकर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू...’ प्रसिद्ध गीतकार आणि लेखक ग.दी. माडगूळकर यांच्या या गीताचे बोल येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांना सेवा देणाऱ्या गायत्री गावित या परिचारिकेच्या सेवेसाठी अगदी तंतोतंत खरे ठरतात. अंगात तापाचा कहर आणि हाताला सलाईन असताना व्हेंटिलेटरवरील रुग्णांना त्या सेवा देत आहेत.

राज्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने रुग्णांना दवाखान्यात बेड मिळत नाही. बेड मिळाले तर ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन मिळाले तर इंजेक्शन नाही, अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात रुग्णांच्या गरजा लक्षात घेता संधिसाधूंचीही कमी नाही. अनेक ठिकाणी रुग्णांना सेवा मिळत नसल्याची बोंब कायम आहे; पण अशाही स्थितीत रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने सेवा देणारे डॅाक्टर आणि परिचारिका खरोखरच रुग्णांसाठी देवदूत म्हणून काम करीत आहेत. बुधवारी असाच देवदूत येथील जिल्हा रुग्णालयात गायत्री अर्जुन गावित या परिचारिकेच्या रूपाने पाहायला मिळाला. गेल्या वर्षभरापासून ही परिचारिका येथील जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांना सेवा देत आहे. या काळात स्वत:देखील अनेक वेळा आजारी असताना त्यांनी मात्र रुग्णसेवेत कुठलीही कुचराई केली नाही. गेल्या दोन दिवसांपासून त्या तापाने फणफणत असतानाही त्यांची ही सेवा सुरूच आहे. बुधवारी त्या स्वत: रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि रुग्णांना सेवाही देत असल्याचे चित्र दिसून आले. त्यांनी हाताला सलाईन लावले होते; पण व्हेंटिलेटरवरील रुग्णासाठी अत्यावश्यक सेवेची गरज असल्याने सलाईन हातात घेऊन त्या या रुग्णांना सेवा देत होत्या, तसेच स्वत: अनुभवी असल्याने इतर परिचारिकांनाही त्याच स्थितीत त्या मार्गदर्शन करून कुठल्या रुग्णावर काय उपचार करावेत, याबाबत मार्गदर्शन करीत होत्या. त्यांची ही सेवा पाहून रुग्णालयात वेदनेने पिडा सोसणाऱ्या रुग्णांनादेखील गहिवरून आले होते.

दोन दिवसांपासून ताप असल्याने आपण येथे उपचार घेत आहोत; पण काही रुग्णांना अत्यावश्यक सेवा देणे गरजेचे असल्याने जेवढी सेवा देणे शक्य ते देण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या सोबत असलेल्या परिचारिकादेखील तळमळीने काम करीत आहेत. गेल्या वर्षभरापासून येथे आपण रुग्णांची वेदना पाहत आहोत. या वेदना आपल्या हातून जेवढ्या कमी करता येतील त्यासाठी प्रयत्न राहील.

-गायत्री गावित,

परिचारिका, जिल्हा रुग्णालय.