शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा मूलभूत अधिकार हिरावून नेणाऱ्या कायद्यात दुरुस्ती करा - शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात तयार केलेल्या संविधानात भारतातील शेतकऱ्यांचे व जनतेचे सर्व मूलभूत अधिकार सुरक्षित होते; मात्र १८ ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात तयार केलेल्या संविधानात भारतातील शेतकऱ्यांचे व जनतेचे सर्व मूलभूत अधिकार सुरक्षित होते; मात्र १८ जून १९५१ रोजी भारताच्या संविधानात पहिली घटना दुरुस्ती करून कलम ३१ (ब) निर्माण करून त्यात परिशिष्ट ९ चा समावेश केला. त्यामध्ये कायद्याच्याविरोधात कुणालाही न्यायालयात दाद मागण्याची सोय नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा मूलभूत अधिकार हिरावून नेण्यात आला आहे. परिशिष्ट ९ नंतर कमाल जमीन धारणा कायदा अंमलात आणून शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्याचा हक्क नष्ट झाला. जीवनावश्यक वस्तू कायद्याचा परिशिष्ट ९ मध्ये समावेश केल्यामुळे शेतीमालाचे दर नियंत्रित करण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांचे व्यवसायात फायदा कमविण्याचे स्वातंत्र्यदेखील त्यामुळे संपुष्टात आले आहे. परिणामी कृषिप्रधान देशातील शेतकरी आर्थिक दारिद्र्यात ढकलला गेला आहे. केवळ शेतकरीच नव्हे, तर सामान्य नागरिक व उद्योजकांचेही स्वातंत्र्य या कायद्याने धोक्यात आले आहे. कायद्याचा आधार घेऊनच अनेक उद्योगांचेही राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. या कायद्याचा सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी गैरफायदा घेतला आहे. या परिशिष्टात आतापर्यंत २८४ कायदे समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यातील बहुतांश शेती व्यवसाय व जमीन धारणेसंबंधातील आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावणाऱ्या या घटना दुरुस्तीचा फेरविचार करण्याची मागणी शेतकरी संघटनेने आपल्या निवेदनात केली आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालीदेखील संघटनेने अनेकवेळा आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केले. परंतु त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने आता तरी त्याची दखल घेऊन राज्य घटनेत १८ जून १९५१ रोजी पहिल्या घटना दुरुस्तीत कलम ३१ (ब) अंतर्गत समाविष्ट केलेल्या परिशिष्ट ९ कायमचे रद्द करावे. किमान त्यात समाविष्ट असलेले कमाल जमीन धारणा कायदा व जीवनावश्यक वस्तू कायदा तरी या परिशिष्टातून वगळावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नरेंद्र चौधरी यांच्यासह अशोक सोमजी पाटील, मोहन वेडू पाटील, मगन रघुनाथ पाटील, महेश नरेंद्र चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.