In the ambulance, the woman gives birth to a baby | रुग्णवाहिकेतच महिलेने दिला बाळाला जन्म

रुग्णवाहिकेतच महिलेने दिला बाळाला जन्म

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील झामणङिारा येथील गरोदर मातेला रूग्णालयात नेतांना वाहनातच प्रसुती करून बाळ व माता यांना वाचविण्यात 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर व सहकारी कर्मचा:यांना यश आले.  आई व बाळ दोन्ही सुखरूप असून, ग्रामीण भागातील रूग्णांसाठी 108 क्रमांकाचे वाहन केवळ रूग्णवाहिकाच नव्हे तर जीवनदायिनी ठरत आहे. 
शनिवारी पुणे मुख्यालयातून नवापूर येथील 108 रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिका:यांना तालुक्यातील दुर्गम भागातील झामणझीरा येथे जावून गरोदर मातेला प्रसुतीसाठी नवापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करा या आशयाच्या सूचना देण्यात आल्या. सूचना मिळताच 108 या रूग्णवाहिकेवर डॉ.राहुल सोनवणे व  पायलट लाजरस गावीत यांनी  तातडीने झामणझीरा गाव गाठलं. तातडीने प्रतिमा अजय गावीत (21) या गरोदर मातेला नातेवाईंकासह रूग्ण वाहिकेत घेत. रूग्णवाहिका नवापूर उपजिल्हा रुग्णालयाकडे कुच करीत असताना मध्यरात्री अध्र्या रस्त्यातच प्रतिमा गावीत यांना असह्य प्रसववेदना सुरू झाल्या.  आई व बाळासाठी हा जीवन  मरण्याचा प्रश्न असल्याचे हेरून डॉ.राहुल सोनवणे यांनी रूग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती केली. 
यानंतर पुढील उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात बाळ व माता यांना दाखल करण्यात आले. चक्क रूग्णवाहिकेतच बाळाचा जन्म झाला. वेळीच योग्य उपचार मिळाल्याने माता व बाळ सुखरूप आहेत. 
 

Web Title: In the ambulance, the woman gives birth to a baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.