अमलपाडा येथील वृद्धाचा नैराश्येतून गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:41 IST2019-03-04T11:41:01+5:302019-03-04T11:41:20+5:30
नंदुरबार : वृद्धाने नैराश्येतून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना अमलपाडा, ता.तळोदा येथे घडली. तळोदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात ...

अमलपाडा येथील वृद्धाचा नैराश्येतून गळफास
नंदुरबार : वृद्धाने नैराश्येतून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना अमलपाडा, ता.तळोदा येथे घडली. तळोदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्र्या धर्मा वसावे (65) रा.अमलपाडा, ता.तळोदा असे मयताचे नाव आहे. वसावे यांनी वृद्धपकाळात आलेल्या नैराश्येतून जीवनयात्रा संपविल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
गावातील राहत्या घरी त्यांनी गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी खबर दिल्याने तळोदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
तपास पोलीस नाईक भिल करीत आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.