शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीया आली तरी सालगडी मिळेना, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

गेल्या दोन-तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकट, पावसावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे. अक्षय्य तृतीया सण जवळ ...

गेल्या दोन-तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकट, पावसावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे. अक्षय्य तृतीया सण जवळ आला की शेतकरी शेतीकामासाठी सालगडी म्हणून नोकरीस कोणाला ठेवावे याचा विचार करू लागतो व त्यानुसार सालगडी शोधत असतो. मागील वर्षी साल गड्याला वार्षीक रक्कम ३५ ते ५५ हजारांपर्यंत सहज दिले गेले होते. यावर्षी अवकाळी पाऊस कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आता आखाजीचा सण जवळ येऊन ठेपला आहे तरीही शेतकरी सालदार ठेवण्याची हिंमत दाखवत नसल्याचे चित्र दिसत आहे. सालगडी मिळत नसल्यामुळे काही शेतकरी बटाईने, भाडेतत्त्वावर शेती करण्याच्या मानसिकतेत आहेत. प्रथेप्रमाणे शेतकरी आखाजीच्या दोन-तीन दिवस अगोदरपासून सालगडी निवडतात पूर्वीचा सालगडी योग्य वाटल्यास त्याच्या वार्षिक रकमेत काही प्रमाणात वाढ करून त्यालाच पुन्हा ठेवले जाते. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने विहीर व बोअरला काही ठिकाणी पाणी कमी झाले आहे, तर काही कोरड्या ठक्क झाल्या आहेत. त्यामुळे शेती उत्पन्न कमी निघाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत सालगडी वर्षाची अदाईगी ५० ते ७० हजार व चार पोते धान्य मागत आहे. दिवसभर शेतात काम करणार, पण रात्री शेतात मुक्कामी राहणार नाही, मालकांनी मोबाइलची सोय करून द्यावी, ठरलेल्या रकमेची निम्मी रक्कम उचल म्हणून सुरुवातीलाच द्यावी, अशा मागण्या सालगडी मांडत आहेत. शेती अवजारे खते बी-बियाणे यांचे दर वाढत आहे अशा परिस्थितीत मोठा बागायतदार किंवा मोठे शेतकरी यांनाही सालदार लावून घेण्याचे अडचणीचे ठरत आहे, तर अल्पभूधारक निम्मेबटाई किंवा पैशाने शेती देण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी यावर उपाय म्हणून हंगामी रखवालदार किंवा गडी निवडतात, त्यातही ज्यांना ट्रॅक्टर चालवीने येते त्यांना शेतकरी प्राध्यान्याने निवडले जाते.

यंदा असलेली लॉकडाऊन, संचारबंदी, कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि दुसरीकडे वाढत चाललेली महागाई यामुळे यंदा शेतीतून अत्यंत कमी उत्पादन निघाले आहे. निघालेल्या मालास बाजारपेठेत भाव मिळाला नाही. बँका कर्जवाटपात दिरंगाई करतात, काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा ही मिळाला नाही, त्यामुळे सालदाराचा पगार व चार पोती धान्य द्यावा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-अर्जुन चौधरी, शेतकरी, बामखेडा