गुजरात हद्दीलगत मिळाले मद्याचे घबाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:19 IST2019-07-31T12:19:23+5:302019-07-31T12:19:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : गुजरात राज्यालगत असलेल्या गडद व सागीपाडा या अतिदुर्गम जंगल भागात 18 लाख रुपये किमतीचा ...

Alcohol found in Gujarat | गुजरात हद्दीलगत मिळाले मद्याचे घबाड

गुजरात हद्दीलगत मिळाले मद्याचे घबाड

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : गुजरात राज्यालगत असलेल्या गडद व सागीपाडा या अतिदुर्गम जंगल भागात 18 लाख रुपये किमतीचा अवैद्य दारु साठा नवापूर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. 
गुजरात हद्दीलगत दारूचा अवैध साठा करुन ठेवलेला असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलीसांचे पथक तयार करून  नवापुर हद्दीतील गुजरात राज्यालगत असलेल्या गडद येथील अतिदुर्गम जंगल भागात पोलीसांनी धाड टाकली. भर पावसात नदी, नाले पार करुन जंगलात मुख्य रस्त्यापासुन तीन कि.मी. आडरस्त्याने पायी चालुन शेतातील एका घरात पोलीसांना इम्पेरियल ब्लु कंपनीच्या सात लाख 53 हजार 360 रुपये किमतीचा  मद्यसाठा मिळुन आला. दिलीप शेगजी गावीत, रा. गडद ता. नवापुर असे त्या शेत मालकाचे नाव समोर आले. ही कारवाई सुरु असतांना गुजरात राज्यालगत जंगल परिसरात असलेल्या सागीपाडा भागात इलेश रतिलाल गावीत रा. सागीपाडा याच्या झोपडीतही अवैध दारुचा साठा असल्याची बातमी मिळाल्याने पोलीसांनी तेथे जाऊन घराची तपासणी केली असता तेथेही इम्पेरियल ब्लु कंपनीच्या दहा लाख 88 हजार 640 रुपये किमतीचा मद्यसाठा मिळुन आला. पोलीसांनी दोन्ही ठिकाणचा मिळालेला मद्य साठा जप्त करुन पोलीस ठाण्यात आणून या प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले. दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपयर्ंत पोलीसांची कारवाई सुरु होती. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहाय्यक पोलिस निरिक्षक दिगंबर शिंपी, पोलीस उप निरीक्षक शिवाजी नागवे यांच्यासह उपनिरीक्षक कृष्णा पवार, हवालदार गुमानसिंग पाडवी,  दादाभाई वाघ, प्रविण मोरे, योगेश थोरात, शांतीलाल पाटील, महेश पवार, अल्ताफ शेख, आदिनाथ गोसावी, हिरालाल सोनवणे, योगेश्वर तनपुरे, दिलवरसिंग पावरा, मोहन साळवे, हितेश पाटील, योगेश साळवे यांनी ही कारवाई केली.

हा दारु साठा कोणी पुरविला या अनुशंगाने घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल संचाच्या आधारे फोन करुन गुजराती भाषेत पोलीसांनी संभाषण केले.  फोनवरील समोरील इसमास आम्हाला मद्य (माल) पाहीजे असे सांगितल्यावर त्यांनी दारु देण्याचे कबुल केले. पोलीसांनी त्या संबंधितास नंदुरबार येथे बोलावुन घेतले. नवापूर पोलीसांच्या पथकाने तेथे जावुन त्याला ताब्यात घेवुन नवापूर पोलीस ठाण्यात आणुन विचारपुस केली असता त्यांची नावे किशोर पाटील व रवि गिरासे रा. सेंधवा (मध्यप्रदेश) असे असल्याचे समजले. त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून दिलीप शेगजी गावीत, रा. गडद व इलेश रतिलाल गावीत रा. सागीपाडा या दोन्ही  संशयित फरार आरोपींचा शोध सुरु आहे. 
 

Web Title: Alcohol found in Gujarat