लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारातील गाझी नगरातील ३२ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे. नंदुरबारातील ही महिला नाशिक येथे उपचारासाठी गेली होती. तेथून परत आल्यावर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी आढळलेल्या तिन्ही रुग्णांच्या संपर्कातील १७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.बुधवारी दुपारी गाझी नगरातील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा भाग सील करण्यात आला आहे. या भागातील महिला नाशिक येथे उपचारासाठी गेली होती. तेथेच ती पॉझिटिव्ह झाली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}