शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यानंतर तळोद्यात समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेनंतर म्हणजे पाच महिन्यानंतर येथील संजय गांधी निराधार समितीची बैठक गुरूवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेनंतर म्हणजे पाच महिन्यानंतर येथील संजय गांधी निराधार समितीची बैठक गुरूवारी झाली. बैठकीत विविध योजनांतर्गत दाखल झालेल्या साधारण 510 प्रकरणांपैकी साधारण 310 प्रकरणे विविध त्रुटय़ांमुळे नामंजूर करण्यात आली आहेत. तथापि 200 प्रकरणेदेखील समितीने पडताळणी करून मंजूर केली आहे. नामंजूर करण्यात आलेल्या प्रकरणांच्या त्रुटींसाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिल्या.तळोदा येथील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत गुरूवारी शासनाच्या संजय गांधी निराधार समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते. या वेळी समितीचे सचिव तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सदस्य राजेंद्र राजपूत, नितीन पाडवी, रसीलाबाई देसाई, यशवंत पाडवी, अनुपकुमार उदासी, संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार एस.पी. गवते, प्रसाद बैकर आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ, श्रावण बाळ व विधवा पेन्शन योजना अशा वेगवेगळ्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी तळोदा शहरासह ग्रामीण भागातून साधारण 510 प्रस्ताव समितीकडे प्राप्त झाले होते. यासर्व प्रस्तावांची कागदपत्रांची पडताळणी सदस्यांनी केली. त्यात विविध कागदपत्रांच्या त्रुटी आढळून आल्यात.  अशी जवळपास 310 प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत. अर्थात 200 प्रकरणेदेखील समितीने मंजूर केली आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रथमच प्रकरणे मंजूर झाल्याचे संजय गांधी निराधार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मंजूर  करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना 164, संजय गांधी निराधार योजना 21, श्रावणबाळ निवृत्ती योजना 15 या प्रमाणे आहेत. जी प्रकरणे विविध त्रुटींमुळे नाकारण्यात आली आहेत. अशा प्रकरणांबाबत महसूल प्रशासनाने आपल्या कर्मचा:यांना कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात. जेणे करून पुढील बैठकीत त्यावर पुन्हा कार्यवाही करण्यात येईल. कोणताही गरजू लाभार्थी या योजनांपासून वंचित राहणार नाही, अशा सूचना आमदार उदेसिंग पाडवी यांनी प्रशासनास दिल्या. दरम्यान, समितीची पुढील बैठक येत्या 7 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

संजय गांधी निराधार विभागाकडून समाजातील दारिद्रय़ रेषेखालील गरजू, गरीब कुटुंबातील लाभाथ्र्याना देण्यात येणा:या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थीस मोठी फिरफिर करावी लागत असल्याचे म्हणणे आहे. कारण या योजनेसाठी जवळपास डझनभर कागद पत्र लागत असतात. त्यातही प्रकरणासाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी या कर्मचा:यांचा चौकशी  अहवालदेखील लागत असतो. मात्र त्यासाठी लाभाथ्र्याना मोठी दमछाक करावी लागत असते. हे कर्मचारी गावात उपलब्ध झाले नाही तर तालुक्याच्या ठिकाणी भाडे खचरून त्यांना यावे लागत असते. या उपरांतही तेथे भेटत नसल्याचा लाभाथ्र्याचा आरोप आहे. साहजिकच कागदपत्रांची पूर्तता वेळेवर करता येत नाही. परिणामी  लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली. याबाबत महसूल प्रशासनाने कर्मचा:यांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी लाभार्थ्ीनी केली आहे.