शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतुकीच्या २५ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीला बंदी घातलेली असताना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी नवापूर पोलिसांनी वाळूची वाहतूक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीला बंदी घातलेली असताना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी नवापूर पोलिसांनी वाळूची वाहतूक करणाऱ्या २५ डंपर ट्रक ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतुकीला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बंदी घातली आहे. असे असताना धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर पोलिसांनी कारवाई करून वाळू भरून वाहतूक करणाºया २५ डंपर ट्रक ताब्यात घेतल्या आहेत. ११ जून रोजी केलेल्या अशाच कारवाईत १३ डंपर ट्रक ताब्यात घेतल्यानंतर ही झालेली दुसरी कारवाई आहे. प्रत्येक डंपर ट्रकमध्ये २० ते २२ टन वाळू भरलेली आहे. तापी नदीच्या गुजरात राज्यातील निर्धारित घाटांमधून वाळूचा उपसा केला जातो. त्याचा लिलाव करून गुजरात राज्यातून महाराष्ट्रासह इतर राज्यात वाळूची वाहतूक केली जाते. कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळूची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. गुजरात राज्यातील निझर येथून नवापूरमार्गे महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व चाळीसगाव याठिकाणी वाळू घेऊन जात असलेल्या २५ डंपर ट्रक राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना जुने सीमा परिवहन तपासणी नाक्याजवळ नवापूर पोलिसांनी ती वाहने अडवून ताब्यात घेतल्यानंतर तहसील कार्यालय आवारात जमा करण्यात आले. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे एकीकडे रस्त्यांची दुरावस्था होत आहे तर वाहनांच्या वाहतुकीचा वेग जास्त असल्याने सामान्य नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. नवापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ११ जून रोजी झालेल्या कारवाईत न्यायालयाकडून दंडात्मक रक्कम वसुलीचे आदेश दिले होते. आजच्या कारवाईत न्यायालयीन आदेशासाठी प्रकरण न्यायालयात समक्ष पाठवण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली होती.