शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी बाजरी कापणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST

शहादा : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतशिवारांमधील उन्हाळी हंगामातील बाजरीची कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. बाजरीच्या कापणीला वेग आला असून, ...

शहादा : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतशिवारांमधील उन्हाळी हंगामातील बाजरीची कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. बाजरीच्या कापणीला वेग आला असून, यामुळे शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. बाजरी कापणीनंतर त्या शेतात खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून नियोजन सुरू आहे.

ग्रामीण भागात रब्बी हंगामातील बाजरीची कापणी सुरू आहे. तसेच शेतातील बाजरीची तुटलेली कणसे वेचून अनेकांना रोजगार व खाण्यासाठी बाजरी उपलब्ध होत आहे. शहादा तालुक्यातील वडगाव, शोभानगर, पाडळदे, अलखेड, आवगे, जुनवणे शेतशिवारात पाणी कमी होत असल्याने ऊस, केळी व पपई आदी बागायती पिकांच्या क्षेत्रात घट होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिंचनाची थोडीफार सोय असणाऱ्या तसेच काही शेतकऱ्यांनी सुसरी धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर उन्हाळी हंगामातील बाजरीची पेरणी केली होती. बाजरीची कणसे भरत आल्याने शेतकऱ्यांनी बाजरी पिकाची कापणी करत थ्रेशरच्या सहाय्याने बाजरी काढण्यात येत आहे.

बाजरीची कापणी व मळणी शेवटच्या टप्प्यात आली असल्याने व सकाळी उन्हाची तीव्रता कमी राहात असल्याने बाजरी कापणीला वेग आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या मजुरांना काही दिवसांकरिता रोजगार उपलब्ध झाला आहे. बाजरीचे पीक काढल्यानंतर खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी नांगरणीसह शेतीची इतर मशागत करून विविध पिकांची पेरणी करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.