शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पावसामुळे शेतकऱ्यांना उभारी खरीप क्षेत्राची ९९ टक्के भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 1:03 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाने जोर धरला असल्याने जिल्ह्यात थांबवण्यात आलेल्या पेरण्यांचे आकडे पुन्हा वाढत असून सोमवारअखेरीस ९९ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाने जोर धरला असल्याने जिल्ह्यात थांबवण्यात आलेल्या पेरण्यांचे आकडे पुन्हा वाढत असून सोमवारअखेरीस ९९ टक्के क्षेत्रावर पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती आहे़ शेतकऱ्यांनी सरासरी ४० टक्के पाऊस असताना ९० टक्के पेरण्या गेल्या १५ दिवसांपूर्वीच पूर्ण केल्या होत्या़जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याची माहिती असून येत्या दोन-चार दिवसात १०० टक्के पेरणीक्षेत्रावर खरीप पिके दिसून येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शेतकºयांनी यंदा प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, भात, ज्वारी आणि मका या पिकांवर भर दिला आहे़ पावसाअभावी यंदा कडधान्य पिक पेरणीत घट येऊन क्षेत्रही कमी झाल्याचे दिसून आले आहे़ गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी १०० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात पेरण्या केल्या होत्या़ पाऊस उशिराने आल्याने पेरणीचा कालावधी लांबला होता़ यंदाही तीच स्थिती निर्माण झाल्याने शहादा तालुका वगळता इतर पाच तालुक्यातील शेतकºयांनी पावसाचा अंदाज घेत पिकांच्या पेरणीला सुरूवात केली होती़ यातून अद्याप ठिकठिकाणी पेरणीची कामे शेतकरी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे़यंदाच्या हंगामात शहादा तालुक्यात ९९ टक्के, तळोदा ११०, धडगाव १०९ तर अक्कलकुवा तालुक्यात १०१ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने या तालुक्यांमध्ये निर्धारित क्षेत्रापेक्षा वाढीव पेरण्या झाल्या आहेत़दुसरीकडे सर्वाधिक पसंतीचा कापूस यंदा १ लाख २४ हजार ६६४ हेक्टरवर लागवड करण्यात आला आहे़ यात नंदुरबार ४८ हजार ८१, नवापूर ८ हजार ५३१, शहादा ५० हजार ४८२, तळोदा १० हजार १०६, धडगाव १ हजार १४ तर अक्कलकुवा तालुक्यात ६ हजार ३९० हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे़जिल्ह्यात आजअखेरीस १८ हजार ८१ हेक्टर क्षेत्रात भात़, ३० हजार ४७ हेक्टर क्षेत्रात ज्वारी़३१ हजार ४५५ हेक्टरवर मका़२१ हजार १४६ हेक्टर सोयाबीन पेरा पूर्ण झाला आहे़धान्य आणि तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढताना मात्र कडधान्य पिकांचे क्षेत्र घटले आहे़ १७ हजार हेक्टरव होणार तूर १० हजार, मूग ४ हजार तर उडीद ९ हजार ३२५ हेक्टरपर्यंत आहे़जिल्ह्यात २ लाख ९५ हजार २१९ हेक्टरवर यंदा पेरण्यांचे नियोजन होते़ त्यातुलनेत आजअखेर २ लाख ८० हजार २०१ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या पूर्ण करण्यात झाल्या आहेत़ यात नंदुरबार ६७ हजार ८ हेक्टर, नवापूर ५५ हजार १७३, शहादा ७५ हजार ३६८, तळोदा २३ हजार ७४७, धडगाव १९ हजार ७२३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३९ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़