उघडय़ा घरातून 90 हजारांची चोरी, पाच महिन्यानंतर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:54 AM2019-08-18T11:54:40+5:302019-08-18T11:54:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घराच्या उघडय़ा दरवाजातून आत जाऊन एकाने घरातील 70 हजार रुपये रोख व 21 हजारांचे ...

90 thousand theft from open house, five months after the crime | उघडय़ा घरातून 90 हजारांची चोरी, पाच महिन्यानंतर गुन्हा

उघडय़ा घरातून 90 हजारांची चोरी, पाच महिन्यानंतर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घराच्या उघडय़ा दरवाजातून आत जाऊन एकाने घरातील 70 हजार रुपये रोख व 21 हजारांचे चांदीचे दागीने चोरून नेल्याची घटना सल्लबारचा माथेआंबेपाडा, ता.मोलगी येथे मार्च महिन्यातत घडली. 16 ऑगस्ट रोजी मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
मुन्ना भाहद्या वसावे, रा.जमाना, ता.अक्कलकुवा असे संशयीताचे नाव आहे. सल्लीबारचा माथेआंबापाडा येथील विज्या तुमडय़ा वळवी यांच्या उघडय़ा घरात घुसून 24 मार्च 2019 रोजी चोरटय़ांनी 70 हजार रुपये रोख आणि 21 हजारांचे चांदीचे दागीने चोरून नेले होते. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती. चोरटय़ांचा ठिकठिकाणी शोध घेतला असता तो जमाना, ता.अक्कलकुवा येथील     मुन्ना भाहद्या वसावे असल्याचा     संशय विज्या वळवी यांना आला. त्यांनी याबाबत मोलगी पोलिसात फिर्याद दिल्याने मुन्ना वसावे याच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तपास हवालदार प्रकाश मेढे करीत आहे. संशयीतास लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.     
 

Web Title: 90 thousand theft from open house, five months after the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.