शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

49 बालकांवर हृदयविकाराच्या होणार मोफत शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात आवश्यक असलेल्या 49 बालकांवर मुंबईत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : स्व.पी.के. अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात आवश्यक असलेल्या 49 बालकांवर मुंबईत टप्प्याटप्प्याने हृदयविकाराच्या मोफत शस्त्रक्रिया होणार   आहेत. पी.के. अण्णा फाऊंडेशन  व विविध शहर ग्राम गुजर मंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे.पी.के. अण्णा फाऊंडेशन व व्हीएसजीजीएमतर्फे दरवर्षी शहादा येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येते. त्यात आवश्यक असणा:या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. यावर्षीही तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत 9 ऑक्टोबर 2019 रोजी बालरुग्णांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिर  घेण्यात आले. त्यात तपासणीनंतर   49 बालरुग्णांवर हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया करणे आवश्यक  असल्याचे तपासणीत आढळून आले. ठाणे येथील ज्युपीटर हॉस्पिटलने या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड केली होती. त्यानुसार 49 पैकी पहिल्या 10 बालरुग्णांना शस्त्रक्रियेसाठी 18 नोव्हेंबरला मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. या बालरुग्णांना मुंबई येथे पाठविण्यासाठी पी.के. अण्णा फाऊंडेशनतर्फे सर्व सुविधा  पुरविण्यात येणार आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर मुंबईहून परत आणण्यासाठीही व्यवस्था या फाऊंडेशनने केली आहे. या रुग्णांना शुभेच्छा देण्यासाठी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक  पाटील व मकरंद पाटील हे   उपस्थित राहणार आहेत. शहादा येथून सोमवारी सायंकाळी सहा वाजता हे बालरुग्ण मुंबई येथे रवाना होणार आहेत.

ज्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. एका रुग्णावर शस्त्रक्रियेसाठी किमान तीन ते चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या रुग्णांवर आता मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांनी फाऊंडेशन व मंडळाचे आभार मानले आहेत.