शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेसाठी २८ बालरुग्ण रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालय व रोटरी क्लब नंदुरबारतर्फे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वयोगटातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालय व रोटरी क्लब नंदुरबारतर्फे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वयोगटातील १३८ लाभार्थ्यांची हृदयरोग शस्त्रक्रिया पूर्वतपासणी शिबिर घेण्यात आले होते. या वेळी ५१ लाभार्थींची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या फेरीतील २८ लाभार्थींना हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी एसएमबीटी मेडीकल कॉलेज, धामणगाव (नाशिक) येथे पाठविण्यात आले.रोटरी क्लब नंदुरबार, चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ नंदुरबार, वेलनेस रिटेल नंदुरबार व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने बालरुग्णांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या फेरीतील २८ लाभार्थींच्या बसला जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून धामणगाव (नाशिक) येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी. सातपुते, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे कर्मचारी, अधिकारी, रोटरी क्लबचे डॉ.निर्मल गुजराथी, डॉ.दुर्गेश शाह, वेलनेस रिटेल सेंटरचे विनय श्रॉफ, सुनील चौधरी, यशवंत स्वर्गे, दीपक दिघे, गजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शून्य ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यात अनेक लघु व मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २२ टीम कार्यरत आहेत.