शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार शेतकरी खरीप कर्जाला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 11:54 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली असतांना अशा संकटाच्या काळात जिल्ह्यातील सुमारे २७ ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली असतांना अशा संकटाच्या काळात जिल्ह्यातील सुमारे २७ हजार ५०० शेतकरी शासनाच्या आश्वासनाला बळी ठरून यंदाच्या खरीप कर्जालाही मुकणार आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम घ्यावा कसा या विवंचनेत हे शेतकरी आहेत.राज्य शासनाने मोठी गाजा वाजा करून गेल्या वर्षी कर्ज माफीची घोषणा केली होती. या कर्जमाफीत जिल्ह्यातील २७ हजार ५०४ शेतकरी पात्र ठरले होते. त्यांची यादी पोर्टलवरही जाहीर करण्यात आली. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असतांना जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे या आचार संहितेच्या कारणाने कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आचार संहिता लांबल्याने कर्जमाफीची प्रक्रियाही रेंगाळली. याच काळात कोरोनाचे संकट उभे ठाकले त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनची स्थिती आहे.सध्या खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरूवात केली आहे. अनेकांनी कापूस लागवडीची तयारीही केली आहे. त्यासाठी खरीप कर्जाची प्रक्रिया बँकांनी सुरू केली आहे. मात्र कर्जमाफी घोषित झालेले २७ हजार शेतकरी अद्यापही शासनाच्या दप्तरात कर्जदार आहेत.यासंदर्भात मंत्री मंडळाच्या बैठकीत कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना थकबाकीदार न समजता त्यांना बँकांनी कर्ज द्यावे, अशी शिफारस करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याची कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचे पात्र शेतकरी केवळ बँकांच्या चकरा मारत आहेत. त्यांना खरीप कर्ज मिळत नसल्याने खरीपाची तयारी करावी कशी असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी देशोधडीला लागत आहे. गेल्या वर्षाचा कापूस व इतर धान्य माल अजून घरातच पडून आहे. विक्रीसाठी अनेक अडथळे येत आहेत. बागायतदार शेतकºयांचे हालही अधिकच वाईट आहे. केळी व पपई खरेदीसाठी वेळेवर व्यापारी येत नसल्याने निम्मा माल शेतातच सडला.व्यापारी मिळाले पण भाव नसल्याने ही शेतीदेखील तोट्याची ठरली. अशा स्थितीत कर्जमाफीबाबतही अनिश्चितता निर्माण होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असले तरी त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बँकांच्या यादीत अद्यापही ते थकबाकीदार आहेत. या शेतकºयांना कर्ज देण्याबाबत बँकांकडून रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव गेले असले तरी तांत्रिक अडचणींमुळे अद्यापतरी त्याबाबतचे कुठलेही आदेश बँकांना नाही. तसे आदेश आल्यास कर्जमाफीतील शेतकºयांना कर्ज देता येईल. इतर शेतकºयांना मात्र कर्जदेणे सुरू आहे.-धीरज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा बँक धुळे.२१५ कोटींचे कर्ज माफजिल्ह्यातील कर्जमाफीच्या यादीत २७,५०४ शेतकरी पात्र आहेत. त्यातील १३,१९१ शेतकºयांना विविध १३ बँकांनी कर्ज दिले आहे तर जिल्हा बँकेने १४,३१३ शेतकºयांना कर्ज दिले आहे. या सर्व शेतकºयांना एकुण २१५ कोटी सात लाख रुपयांचे कर्ज माफीचा फायदा होणार आहे.