सुविधांसाठी 25 किलोमीटर पायपीट

By Admin | Updated: October 12, 2015 00:15 IST2015-10-12T00:15:13+5:302015-10-12T00:15:13+5:30

40 अनाथ मुलांच्या गटाने केवळ सुविधा मिळाव्यात यासाठी तळोदा येथून निघून नंदुरबार गाठण्याच्या ध्येयाने 25 किलोमीटरची पायपीट केली़

25 kms of footpath for convenience | सुविधांसाठी 25 किलोमीटर पायपीट

सुविधांसाठी 25 किलोमीटर पायपीट

नंदुरबार : डोळ्यात अश्रू , चेह:यावर घामाच्या धारा, मनात संताप, अशा अवस्थेतील 40 अनाथ मुलांच्या गटाने केवळ सुविधा मिळाव्यात यासाठी तळोदा येथून निघून नंदुरबार गाठण्याच्या ध्येयाने 25 किलोमीटरची पायपीट केली़ तळोदा येथील कल्याणी बालसदनातील मुलांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सुरू केलेला प्रवास अखेर रात्री साडेआठ वाजता नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावर येऊन थांबला़ गावातील एकलव्य पुतळ्याखाली विसावलेल्या या मुलांची व्यथा समजून घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ग्रामस्थांनी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करून त्यांना आधार दिला़

तळोदा येथून नंदुरबारकडे निघालेल्या या मुलांची आमलाड, दसवड फाटा, पिसावर, प्रकाशा फाटा, साखर कारखाना, लहान शहादे येथील नागरिकांनी विचारपूस करत त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तूंसह पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून दिल़े शनिवारी रात्री कोळदे गावात मुक्काम करणारे विद्यार्थी दुपारी एक वाजेर्पयत त्यांच्या मागण्यांवर कारवाई करण्याची मागणी करत होत़े

4रविवारी दुपारी मुलांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महिला बालविकास विभागाच्या अधिका:यांनी पुढाकार घेतला़ त्यांनी मुलांची समजूत काढत सुविधा मिळतील असा विश्वास दिल्यानंतर एक वाजेनंतर मुले तळोद्याकडे खासगी वाहनाने गेली़

 

विद्याथ्र्यासोबत चर्चा

4रात्री जेवणाची व्यवस्था केल्यानंतर कोळदे ग्रामस्थांनी या विद्याथ्र्याची झोपण्याची व्यवस्था जवळच्या सामाजिक सभागृहात केली होती़ रात्रीच्या गावात मुक्कामी असलेल्या विद्याथ्र्याची भेट घेण्यासाठी नंदुरबार शहरातील सामाजिक कार्यकत्र्यानी भेटी देऊन माहिती जाणून घेतली़ रविवारी सकाळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हिरा पाडवी, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क़ेजी़पवार, जिल्हा महिला बालविकास अधिकारी जी़क़ेवळवी, प्रा़ ईश्वर धामणे, कोळदे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष नथ्थू वळवी, अंबरसिंग परदेशी, आनंद गावीत यांच्यासह जय आदिवासी ब्रिगेडच्या कार्यकर्ते उपस्थित होत़े त्यांनी विद्याथ्र्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या़

बाहेर गावी असल्याने नेमके काय झाले, याची अजूनही माहिती नाही़ बालसदन गृहातील मुलांना सर्व प्रकारच्या सोयी दिल्या जात आहेत़ गेल्या 20 वर्षापासून हे कार्य सुरू आह़े मुलांना पोटभर जेवण दिले जात़े त्यांची प्रगती आणि शिक्षणासाठी संस्था कायम आग्रही असत़े त्यांचे हे हक्काचे घर आह़े, आणि या घरात त्यांना कायमच योग्य न्याय दिला आह़े ही घटना मनाला चटका लावणारी आह़े

-वंदना तोरवणे, संचालिका, कल्याणी बालसदनगृह, तळोदा

चांगले जेवण मिळत नसल्याने विद्याथ्र्याची आबाळ होत आह़े बालगृहाचे कर्मचारी, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात, आत्मविश्वास खचेल या भाषेत बोलतात़ यामुळे विद्यार्थी कायम भीतीत असतात़

-विलास डुमकुळ, विद्यार्थी

Web Title: 25 kms of footpath for convenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.