शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लंडनहून नंदुरबारात आलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला केले क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पावले उचलली असून यांतर्गत जगातील विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष पावले उचलली असून यांतर्गत जगातील विविध देशातून भारतीयांना परत आणले जात आहे़ यात भालेर ता़ नंदुरबार येथील १८ वर्षीय विद्यार्थी सोमवारी पहाटे नंदुरबारात परत आला़ सतर्कता म्हणून त्याला क्वारंटाईन करण्यात आले असून त्याची प्रकृती ठिक असल्याची माहिती देण्यात आली आहे़भालेर येथील रहिवासी असलेला १८ वर्षीय युवक इंग्लडमधील कार्डिफ (लंडन) येथे शिक्षणासाठी सप्टेंबर २०१९ मध्ये दाखल झाला होता़ शिक्षण सुरळितपणे सुरु असताना कोरोनाची साथ फोफावल्याने त्याचे पालक चिंतेत होते़ इंग्लंड मायदेशी परत येता यावे यासाठी विद्यार्थ्याने ब्रिटीश गर्व्हमेंटसोबत महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला होता़ त्याच्या पालकांनी खासदार डॉ़ हीना गावीत यांची महिनाभरापूर्वी भेट घेत मुलाला नंदुरबारमध्ये परत आणण्यासाठी विनंती केली होती़ त्यानुसार खासदार गावीत यांनी त्याचवेळी आश्वासन दिले होते़ दरम्यान केंद्र शासनाने गेल्या आठवड्यापासून बंधने शिथिल करुन परदेशात अडकलेल्यांना आणण्याची सोय करत नोंदणी सुरु केली होती़ यात खासदार डॉ़ हीना गावीत यांनी केंद्र शासन आणि इंग्लंडमधील भारतीय राजदूत यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर शुक्रवारी लंडनहून परतणाऱ्या पहिल्याच विमानाचे तिकिट विद्यार्थ्याला मिळाले होते़ रविवारी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला तातडीने नंदुरबार येथे रवाना करण्यात आले़ त्याचे वडील व आणखी एक जण अशा दोघांनाच त्याला मुंबई येथून परत आणण्याची परवानगी देण्यात आली होती़ रविवारी रात्री नंदुरबार येथे आल्यानंतर त्याला होळ तर्फे शिवारातील सामाजिक न्याय विभागाच्या शाळेत तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले़ याठिकाणी वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली़ प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे़