शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिमेत तळोदा तालुक्यात १३ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार :  आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग व कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत तळोदा तालुक्यातील कुष्ठरोगाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार :  आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग व कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत तळोदा तालुक्यातील कुष्ठरोगाचे २० तर क्षयरोगाचे १३ रूग्ण आढळून आले आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी दुर्गम, अतिदुर्गम भागात पायपीट करून परिश्रम घेत आहेत.          शासनाच्या निर्देशानुसार तळोदा तालुक्यातील विविध गावात क्षयरोग निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी तालुक्यातील एकूण ११८ आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज गावागावात जाऊन २० ते २५ घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन हे पथक सर्वेक्षण करीत आहेत. १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये एक लाख ७२ हजार २९७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आतापर्यंत एक लाख ७१ हजार ९६७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.            यामध्ये क्षयरोगाचे ५१८ संशयित आढळून आले आहेत. आतापर्यंत १३ जणांना क्षयरोगाची लागण  झाल्याचे तपासणीअंती निदान झाले आहे. त्यांना योग्य औषधोपचार सुरू करण्यात आला असून, त्यांना बरे करण्यासाठी पूर्ण उपचार  आरोग्य विभागाकडून देण्यात येणार आहे.कुष्ठरोग तपासणीतदेखील एकूण संशयित ८५१ आढळले आहेत. वैद्यकिय अधिकारींमार्फत त्यांची तपसाणी केली असता १६ जणांना कुष्ठ रोग असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना तात्काळ औषधी देऊन उपचार सुरू केले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.                सर्वेक्षणात आढळलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी मार्गदर्शन करत आहे. यासाठी  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, डॉ.विशाल चौधरी, डॉ.रेखा शिंदे, डॉ.सायसिंग पावरा, कुष्ठरोग पर्यवेक्षक वंदना वळवी, योगिता पाटील, क्षयरोग पर्यवेक्षक          बाळू पाटील, कौस्तुभ बडोदेकर आदींसह सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

क्षयरोग व कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत तळोदा तालुक्यात सर्वेक्षणाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, त्यात कुष्ठरोगाचे १६ तर क्षयरोगाचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज दिसून येतात. त्याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येणार आहे.  - डॉ.महेंद्र चव्हाण,     तालुका आरोग्य अधिकारी, तळोदा