शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील १११ संस्था अवसायनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

नंदुरबार जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक सहकारी संस्था सध्या कार्यरत आहेत. यातील ४४१ संस्थांचा निवडणूक कार्यक्रम गेल्या वर्षापासून रखडला आहे. ...

नंदुरबार जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक सहकारी संस्था सध्या कार्यरत आहेत. यातील ४४१ संस्थांचा निवडणूक कार्यक्रम गेल्या वर्षापासून रखडला आहे. यातच नवीन सहकार कायद्यानुसार नियमांचा भंग करणाऱ्या १११ संस्था या अवसायनात गेल्याचे समोर आले होते. वर्षानुवर्षे सुरु असलेले आर्थिक गैरव्यवहार, संचालक मंडळांची बरखास्ती, आर्थिक अपहाराचे गुन्हे, फौजदारी कारवाई यासह विविध कारणांमुळे १११ सहकारी संस्था पूर्णपणे बंद पडल्या आहेत. यातून या संस्थांवर अवसायकांची नेमणूक करत त्यांचा लेखाजोखा तपासून त्या अवसायानात काढण्याची प्रक्रिया दीर्घ काळापासून सुरु आहे. यातून गेल्या सहा महिन्यांपासून तपासणीअंती केलेल्या कामाची तपासणी पूर्ण होत आली असून त्यानुसार कामकाज पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून या संस्थांचे कामकाज येत्या काळात पूर्णपणे रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अवसायानात गेलेल्या संस्थांमध्ये गृहनिर्माण, सहकारी बहुउद्देशीय संस्था, दुग्धोत्पादन संघ, मजूर सोसायट्या तसेच सहकारी पतसंस्थांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. परंतु येत्या काही दिवसातच संस्था रद्द करण्याची कार्यवाही पूर्ण होणार असल्याची माहिती कार्यालयीन सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, एकीकडे १११ संस्थांचे कामकाज हे अवसायानात गेले असताना, दुसरीकडे ४४१ सहकारी संस्थांचा रखडलेला कार्यक्रम पुन्हा नव्याने सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने ३१ मार्चपर्यंत या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थागिती दिल्याचे आदेश होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गात या स्थगितीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती आहे. यातून येत्या जून ते जुलैदरम्यान निवडणुकांची अधिसूचना नव्याने काढून निवडणूक कार्यक्रम राबवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.