शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी १०० जणांना केले क्वॉरंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन वृद्ध महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन वृद्ध महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर या रुग्णालयातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम दोन दिवस करण्यात आले. जवळपास १०० पेक्षा अधीक जण त्यातून निष्पन्न झाले असून यातील काही अपवाद वगळता सर्वांनाच होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांच्या स्वॅबच्या अहवालाकडे आता लक्ष लागून आहे.सलग दोन दिवस दोन वृद्ध महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णालय लागलीच सील करण्यात आले आहे. आता या दवाखान्यात आलेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती काढून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.१०० पेक्षा अधीक जणरुग्णालयाच्या संपर्कात दोन्ही वृद्ध अ‍ॅडमीट असतांना अनेकजण आले होते. आरोग्य विभाग आणि पोलिसांनी गेल्या आठ ते दहा दिवसातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रुग्णांना पहाण्यासाठी आलेले अशा सर्वांची माहिती काढली जात आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधीक जण निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्वांना शोधून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. काहींना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्रतिबंधीत व बफर क्षेत्रपालिका क्षेत्रातील भाग चार मधील अनेक भाग हे प्रतिबंधीत क्षेत्र व बफर झोन जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणी बॅरीकेटींग करण्यात आले आहे. त्यानुसार चार भागात ते विभागण्यात आले आहे. स्वागत कलेक्शन ते अहिल्या देवी विहिर, कुंभारवाडा ते बालाजीवाडापर्यंत तेथून सोनारखुंटपर्यंत, संकटमोचन मंदीर ते गणपती मंदीर व पुढे गंगामाता मंदीरपर्यंत तेथून कंचन हॉटेल व पुढे जुनी जनता बँकेपर्यंतचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र राहणार आहे.या भागात कुंभारगल्ली, स्वामी नारायण चौक, महाराष्टÑ बँक परिसर, गणपती मंदीर, अंबिका मंडळ परिसर, संतोषीमाता परिसर, अहिल्यादेवी विहिर परिसर हा प्रमुख भाग येतो.याशिवाय बफर झोनमध्ये या भागाच्या एक किलोमिटर परिसर बफर झोन घोषीत करण्यात आला आहे.नेहमीप्रमाणे बाजारासाठी गर्दीप्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आल्यानंतर देखील या भागालगतच्या परिसरात बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यात आली होती. पोलिसांनी बॅरीकेटींग करून देखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत होते. बॅरीकेटींगच्या ठिकाणी पोलीस व होमगार्डचे कर्मचारी नेमण्यात आले होते. परंतु त्यांनाही काहीजण जुमानत नसल्याची स्थिती होती. त्यामुळे बंदोबस्तावरील कर्मचारीह हवालदिल झाले होते.आरोग्य तपासणी करणारया भागात राहणाºया सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. घरोघरी जावून आरोग्य कर्मचारी तपासणी करीत आहेत. तपासणीसाठी नागरिकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या भागात पालिकेतर्फे आतापर्यंत तीन वेळा जंतूनाशक फवारणी देखील करण्यात आली आहे. नागरिकांनी या भागात विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.नागरिकांनी स्वत:हून पुढे यावेरुग्णालय आणि पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांनी स्वत:हून आरोग्य तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. ताप, सर्दी, खोकलाचे लक्षणे असल्यास तातडीने जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.पोलिसांना प्रतिबंधीत क्षेत्रात बंदोबस्तासाठी तैणात राहावे लागते. अशा वेळी त्यांना कुठलेही संरक्षणाचे साधन नसते. परिणामी आरोग्याचा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता विविध सेवाभावी संस्था, संघटना, व्यक्ती आणि पोलीस दलातर्फे देखील कर्मचाºयांना पीपीई किट देण्यात येत आहेत. यामुळे पोलीस वर्तूळात समाधान व्यक्त होत आहे.